Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणचं संपूर्ण आयुष्यचं बदलून गेलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर सूरजने नाव कोरलं. यंदाची ही मानाची ट्रॉफी बारामतीत गेली. सूरज चव्हाण हे नाव ‘बिग बॉस’ आधी टिक टॉकमुळे चर्चेत आले होते. टिक टॉकवर विविध गमतीशीर रील व्हिडीओ शेअर करत त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सोशल मीडियावर सूरजचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर त्याच्या रील व्हिडीओला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यानंतर सूरजच्या या रील व्हिडीओची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. यानंतर आता सूरज पुन्हा रील व्हिडीओ करायला सक्रिय झाला आहे.
बारामतीच्या छोट्याश्या गावातून आलेल्या सूरजने आपल्या साध्याभोळ्या स्वभावाने महाराष्ट्रातील सर्वच प्रेक्षकांना आपलसं केलं. टिक टॉकवरील व्हिडीओंमुळे सूरज सोशल मीडियावर प्रसिद्धीझोतात आला. आपल्या झापूक झूपूक अंदाजाने त्याने सर्वांना वेड लावलं होतं. सूरज गरिबीतूनवर आलेला असल्याने आणि अगदी निर्मळ मनाचा असल्याने महाराष्ट्रातील जनतेने त्यालाच पाठिंबा दिला. शो संपल्यानंतर सूरजमध्ये अनेक बदल झालेले पाहायला मिळाले, यावरुन त्याच्या चाहत्यांनी त्याला टोकलं आहे.
सूरज चव्हाण नुकताच रितेश देशमुखच्या लोकप्रिय गाण्यावर थिरकला आहे. या गाण्यात त्याचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळत आहे. ‘वेड’ चित्रपटातील “मला वेड लावलंय…” या गाण्यावर तो डान्स करताना दोस्त आहे. हा व्हिडीओ पाहून सूरजमधील बदलावर आता चाहत्यांनी भाष्य केलं. सूरज आधी जसे व्हिडीओ करायचा ते लोकांना पाहायचं आहे असं अनेकांनी म्हटलं आहे. सूरज आता शिकवून वागतोय असं अनेकांचं म्हणणं आहे.
आणखी वाचा – ‘बिग बॉस १८’कडे प्रेक्षकांची पाठ, टीआरपीमध्ये मोठी घसरण, नेटकऱ्यांनी ‘या’ स्पर्धकाला धरलं जबाबदार
प्रेक्षक सूरजच्या आधीच्या बेधडक, गमतीशीर व्हिडीओला मिस करत आहेत. नेटकऱ्यांनी कमेंट करत, “अरे सूरज भाई तू अगोदर जे व्हिडीओ काढत होता त्यामुळेच तू आज अख्ख्या महाराष्ट्राच्या मनात आहेस. तसेच व्हिडीओ काढ हे असं कोणाचं ऐकून तुझी स्टाईल चेंज करु नको”, “सूरज पहिल्यासारखी व्हिडीओ करत जा भाऊ”, “सूरज तू तुझा पॅटर्न विसरत चालला आहेस”, “आम्हाला पहिला सूरज पाहिजे, त्याचे आधीसारखे व्हिडीओ पाहिजेत”, असं म्हटलं आहे.