शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

यालाच म्हणतात संस्कार! ‘हीच आमुची प्रार्थना’ गाणं लागताच सूरजने जोडले हात, साधेपणाचं होतंय कौतुक

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 14, 2024 | 7:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan fold his hands after Hich Amuchi Prarthana song starts netizens Appreciating him for his simplicity

Bigg Boss Marathi 5 च्या घरात 'हीच आमुची प्रार्थना' गाणं लागताच सूरजने जोडले हात, साधेपणाने वेधलं लक्ष

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या या नवीन पर्वाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या घरातील सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणचा साधेपणा लोकांना भावतो आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणपती विशेष भागात सूरजने केलेल्या कृतीने अनेकांची मनं जिंकली. गणेशोत्सवानिमित्त झालेल्या विशेष भागात ‘बिग बॉस मराठी’च्या स्पर्धकांना उकडीचे मोदक देण्यात आले होते. यावेळी सगळ्यांनी मोदक खाल्ले. सूरजलादेखील मोदक देण्यात आला, पण तेव्हा सूरज रितेशला “एक मोदक गणपती बाप्पाला दिला तर चालेल का?” असं म्हणाला आणि त्याची हीच कृती कौतुकास्पद ठरली. सूरज चव्हाणने स्वत: मोदक खाण्याआधी गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून ठेवला. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan)

सूरज चव्हाणच्या या कृतीने त्यानी सर्वांचीच मनं जिंकली. अशातच नुकत्याच झालेल्या कॉईन्सच्या टास्कमध्ये “मी साधा माणूस आहे. मला पिझ्झा, बर्गर नाही तर भाकरी-कालवण आवडतं” असं म्हटलं. ‘बिग बॉस’च्या घरात शुक्रवारच्या भागात ज्यांच्याकडे सर्वात जास्त कॉईन्स आहेत त्या कोणत्याही स्पर्धकाला एखादा लक्झरी पदार्थ विकत घेण्याची संधी ‘बिग बॉस’ने दिली होती. यात केक, बिर्याणी आणि पिझ्झा असे तीन पदार्थ असतात. मात्र सूरज यापैकी कोणताही पदार्थ विकत घेण्यास स्पष्ट असा नकार देतो. सूरजचा हा साधा भोळा त्याच्या चाहत्यांना आणि  महाराष्ट्रातील अनेकांना आवडला. अशातच आता त्याने पुन्हा एकदा केलेली एक कृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – “Bigg Boss च्या घरात आमची मुलगी मार खायला गेली आहे का?”, निक्कीच्या आईने व्यक्त केली तळमळ, म्हणाल्या, “आर्याला घराबाहेर काढा आणि…”

‘बिग बॉस मराठी’च्या शनिवारच्या भाऊचा धक्कामध्ये रितेशने सर्वांसाठी एक गाणे वाजवले. यावेळी गाणं वाजताच सूरजने आपले हात जोडले. भाऊचा धक्कामध्ये रितेशने असं म्हटलं की, “घरात रोज सकाळी एक गाणे वाजते हे मी टीव्हीवर बघतो. पण मला हे आता प्रत्यक्ष पहायचे आहे. त्यामुळे मी आता एक गाणं वाजवणार असून त्यावर सर्वांनी डान्स करायचा आहे”. यापुढे रितेश सूरजला काय सूरज एकदम तयारी” असंही विचारतो. यावर सुरज हसत हसत “हो सर” असं म्हणतो. यानंतर ‘हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ हे गाणं वाजतं आणि हे गाणं वाजताच सूरज नकळत आपले हात जोडतो. शाळेत न गेलेला सूरज या प्रार्थनेमधील शब्द अचूक ओळखून त्याचा अर्थही समजतो.   

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुम्ही काय टास्क खेळलात”, कलाकारांबरोबरच रितेशनेही केलं पॅडी कांबळेंच्या खेळाचे कौतुक, म्हणाला, “अरबाजने पकडण्याचा प्रयत्न केला तरी…”  

त्यामुळे सूरजची ही कृती कौतुकास्पद ठरत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरजने अनेकदा केलेल्या साध्या सोप्या कृतीमुळे अनेकांची मनं जिंकली आहेत. अशातच त्याची ही साधी सोपी कृतीदेखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओखाली प्रेक्षकांनी त्याचे कौतुक करत “सूरजने माणुसकी दाखवली”, “सूरज प्रत्येक गोष्टीत मन जिंकतो”, “माणुसकी फक्त सूरज आणि आंकिताने दाखवली”, “सुरजकडे बघून छान वाटलं’ अशा अनेक कमेंट्सद्वारे सूरजचे कौतुक केलं आहे.  

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi suraj chavanSuraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
jaya bachachan behaviour with paparazzi

जया बच्चन पापाराझींवर का चिडतात? सुप्रसिद्ध फोटोग्राफरनेच सांगितलं कारण, म्हणाला, "त्यांचा पाठलाग केला की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.