सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“Bigg Boss च्या घरात आमची मुलगी मार खायला गेली आहे का?”, निक्कीच्या आईने व्यक्त केली तळमळ, म्हणाल्या, “आर्याला घराबाहेर काढा आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 14, 2024 | 4:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Nikki Tamboli mother angry on Aarya Jadhav

आर्याने निक्कीला कानाखाली मारल्यावरुन निक्कीची आईने आर्याबद्दल व्यक्त केला राग, व्हिडीओ चर्चेत

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ हा रिअ‍ॅलिटी शो सध्या प्रचंड चर्चेत आहे. सध्या या शोमध्ये एक वेगळाच राडा झाला आहे. निक्की तांबोळी व आर्या जाधव यांची एका टास्कमध्ये झटापट झाली. अन् त्या हाणामारीत आर्यानं चक्क निक्कीच्या थोबाडीत मारली. नियमानुसार ‘बिग बॉस’च्या घरात हिंसा करणं हा गुन्हा आहे आणि या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या स्पर्धकाला थेट घरातून बाहेर काढलं जाईल. पण उलट आर्यानं उचलेलं हे पाऊल पाहून मराठी प्रेक्षकवर्ग प्रचंड खुश झाला आहे. ‘तमाम महाराष्ट्राची इच्छा तू पूर्ण केलीस’ असं म्हणत नेटकऱ्यांनी आर्याचं कौतुक केलं आहे. मात्र आर्याच्या या वागणुकीवर आता ‘बिग बॉस’ काय निर्णय घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. अशातच निक्कीच्या आईनेदेखील त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Nikki Tamboli mother angry on Aarya Jadhav)

निक्कीच्या आईने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत निक्कीबरोबरच्या वर्तणूकीवर भाष्य केलं असून यात त्यांनी निक्कीला संरक्षण देण्याबरोबरच आर्याला घराबाहेर काढण्याची मागणी केली आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की , “नमस्कार मी प्रमिला तांबोळी, निक्कीची आई. काल (शुकवार) ‘बिग बॉस’च्या घरात जी घटना घडली. आर्याने निक्कीवर जो अटॅक केला. यावेळी आर्याने शारीरिक इजा केली आणि ही गोष्ट निंदनीय आहे. ‘बिग बॉस’ने यांची गंभीर दाखल घ्यायला हवी. आम्ही इथे राहून काहीच करु शकत नाही. पण आम्हाला आमच्या मुलीची काळजी वाटत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात तिच्याबरोबर रोजचं असं काहीतरी घडत आहे. मागच्या आठडव्यात संग्रामने तिच्याबद्दल मोठमोठ्या गोष्टी केल्या आणि निक्कीला कल्पना न देता पाण्यात ढकळूण दिलं. हे काय वागणं आहे? हे असं व्हायला नाही पाहिजे. तिला काही त्रास झाला असता, तिच्या नाका-तोंडात पाणी गेलं असतं तर. पण ठीक आहे तिला काही त्रास झाला नाही. पण संग्रामने योग्य केलं नाही”.

View this post on Instagram

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “अरबाज हे करतो अरबाज ते करतो असं म्हणत तुम्ही त्याचा बाऊ करता. पण असं त्याने नक्की काय केलं आहे. अरबाज कितीही आक्रमकपणा करत असला तरी त्याच्या आक्रमकतेमुळे कुणालाही इजा झालेली नाही. कुणाला दुखापत झाली नाही. पण निक्कीला त्रास झाला आहे. मागे एकदा आर्या निक्कीच्या हाताला चावली होती. तिच्या हाताला तिने इतकं घट्ट आवळून धरलं होतं की त्यामुळे निक्कीचा हात काळा झाला होता. त्याची ‘बिग बॉस’ने दखल घेतलेली दिसली नाही. शनिवार-रविवारच्या भाऊचा धक्कावर हे कधीच दाखवलं नाही. नको त्या गोष्टी उकरुन दाखवता पण निक्कीच्या बाबतीत सारखं-सारखं हे असं होत आहे”.

आणखी वाचा – आत्महत्या की अपघात?, मलायका अरोराच्या वडिलांच्या मृत्यूबाबत अनेक खुलासे, २४ तासात नक्की काय काय घडलं?

यापुढे निक्कीच्या आई या व्हिडीओमध्ये असं म्हणाल्या आहेत की, “काल (शुक्रवार) आर्याने टास्क खेळण्याऐवजी निक्कीला त्रास कसा द्यायचा?, तिला कसं अडवायचं?, तिला कसं खेळू द्यायचं नाही? हे वर्षा, अंकिता व आर्या यांनी ठरवलंच होतं. ‘बिग बॉस’ने ग्रुपही असा बनवला आहे की ज्यात निक्कीला त्रास देणाऱ्या सगळ्या एकत्र आहेत. आर्याने दार लावून घेतल्यानंतर ‘बिग बॉस’ने एकदाही म्हटलं नाही की आर्या हे खेळाच्या नियमात नाही. त्याचाच परिणाम हा झाला की पुढे आर्याने माझ्या मुलीला मारलं. त्यामुळे ‘बिग बॉस’ कृपया याची गंभीर दखल घेतली पाहिजे. हे खूप चुकीचे आहे”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “त्याला सगळं कळतं”, अरबाजने वैभवकडे केली सूरजची चुगली, म्हणाला, “तो साधा माणूस नाही तर…”

पुढे निक्कीच्या आईने थेट ‘बिग बॉस’ला जाब विचारत “आमची मुलगी ‘बिग बॉस’च्या घरात मार खायला गेली आहे का?” असं म्हटलं आहे. शिवाय आर्याबद्दल त्यांनी असं म्हटलं आहे की, “‘बिग बॉस’ला माझी हात जोडून विनंती आहे की, माझ्या मुलीला शारीरिक संरक्षण मिळालं पाहिजे. तर आम्ही ‘बिग बॉस’चा शो पाहू शकतो. आमचा विचार करा, शो बघताना आम्हाला कसं वाटत असेल त्याचा विचार करा. आम्हाला ‘बिग बॉस’च्या घरात आर्या नको आहे. त्यामुळे तिला बाहेर काढा”.               

Tags: Bigg Boss Marathi 5 Entertainment Newsnikki tamboliNikki Tamboli mother angry on Aarya Jadhav
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Tharla Tar Mag New Promo

Tharla Tar Mag : सायली हिच खरी तन्वी, अर्जुनसमोर आलं मोठं सत्य, प्रियाचा पर्दाफाश कसा करणार?, प्रोमो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.