सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “तुम्ही काय टास्क खेळलात”, कलाकारांबरोबरच रितेशनेही केलं पॅडी कांबळेंच्या खेळाचे कौतुक, म्हणाला, “अरबाजने पकडण्याचा प्रयत्न केला तरी…”  

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 14, 2024 | 6:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 host Riteish Deshmukh praised paddy aka Pandharinath Kamble game in the house.

Bigg Boss Marathi 5 मधील पॅडी कांबळेंच्या या खेळाचं रितेश कडून कौतुक, म्हणाला, “हा आठवडा तुम्ही गाजवलात”

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची चर्चा सर्वत्र जोरदार सुरु आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या सातव्या आठवड्यात संग्राम चौगुलेनं वाईल्ड कार्ड एन्ट्री केली. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या खेळाला चांगलीच रंगत आली. अशातच पहिले दोन आठवडे शांत असलेले पॅडी कांबळे आता त्यांचा खेळ दाखवत असून प्रत्येक खेळामध्ये त्यांनी बाजी मारली आहे. नुकत्याच झालेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये पॅडी यांनी अरबाज व वैभव यांना सळो की पळो केलं. पॅडी कांबळेंच्या या खेळाचं मराठी कलाकारांनी सोशल मीडियावरी पोस्ट शेअर करत कौतुक केलं. (Riteish Deshmukh Praised Pandharinath Kamble) 

‘बिग बॉस’च्या घरात सातव्या आठवड्यातील पहिला कॅप्टन्सी टास्क पार पडला. या टास्कमध्ये सर्वांना छोट्या गोण्यांमध्ये कापूस भरून ज्या सदस्यांना कॅप्टन्सीचं उमेदवार बनवायचं नाही अशा सदस्यांना या गेमच्या बाहेर करायचं होतं. या खेळामध्ये पॅडी यांनी चपळता दाखवत अरबाज आणि वैभव यांची भंबेरी उडवून लावली. त्यांचा हा खेळ पाहून मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव व विशाखा सुभेदार यांनी खास पोस्ट शेअर केली होती. अशातच आता रितेश देशमुखनेदेखील पॅडी कांबळे यांचं कौतुक केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

यावेळी रितेश पॅडी यांना असं म्हणाला की, “पॅडी भाऊ, तुम्ही हा टास्क काय खेळलात. तुमची चपळाई पाहण्यासारखी होती. तुम्ही ससा नाही झालात पण सस्यासाखे धावलात. लहानपणी कबड्डी, खोखो खेळलेले दिसताय”. यावर पॅडी असं म्हणतात की, “खेळ फार खेळलो नाही पण लहानपणापासून अंगात चपळता होती आणि आता तुम्हीही कौतुक करत आहात म्हणजे ती अजूनही असेल असं मला वाटतं”.

आणखी वाचा – “Bigg Boss च्या घरात आमची मुलगी मार खायला गेली आहे का?”, निक्कीच्या आईने व्यक्त केली तळमळ, म्हणाल्या, “आर्याला घराबाहेर काढा आणि…”

यावर रितेश असं म्हणतो की, “तुमची चपळाई आम्हाला आणि प्रेक्षकांना दिसत आहे. अरबाजने पकडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही अंगाला तेल लावूनच आला होतात. माझ्यामते हा आठवडा कुणी गाजवला असेल तर तो पॅडी भाऊ तुम्ही…” दरम्यान, पॅडी यांच्या खेळीचे विशाखा यांनीही कौतुक केलं होतं. “वय वर्षे ५२ असावं तूझ अंदाजे.. पण बाबो.. कसलं पळवलं आहेस त्यांना. मज्जा आली.. बहारदार खेळला आहेस तू..” अशी पोस्ट शेअर करत विशाखा यांनी पॅडी यांचे कौतुक केले.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “मी कधीच कोणती गोष्ट स्वार्थाने केली नाही”, चुगली ऐकून अंकिता व डीपीवर भडकले पॅडी, म्हणाले “घराबाहेर गेल्यावर त्यांना कळेल की…”

तसंच अभिनेता सिद्धार्थ जाधवने “Well Played भावा… काही लोकांना ओव्हर अ‍ॅक्टिंग वाटत होती, त्यांना तुझा Over Active पणा नक्कीच दिसला असेल… कसलं पळवलंस दोघांना… यालाच म्हणतात ‘अनुभव!” अशी पोस्ट करत पॅडी कांबळे यांचे कौतुक केलं होतं. त्यानंतर आता बिग बॉसचा होस्ट रितेशनेदेखील पॅडी यांच्यावर स्तुतीसुमन उधळले आहेत.

Tags: Pandharinath Kambleriteish deshmukhRiteish Deshmukh praised paddy aka Pandharinath Kamble
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Bigg Boss Marathi 6 Winner
Entertainment

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची विजेती ठरली तन्वी कोलते, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

एप्रिल 20, 2026 | 10:15 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan fold his hands after Hich Amuchi Prarthana song starts netizens Appreciating him for his simplicity

यालाच म्हणतात संस्कार! 'हीच आमुची प्रार्थना' गाणं लागताच सूरजने जोडले हात, साधेपणाचं होतंय कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.