Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं घर म्हटलं की वाद हे आलेच. १०० दिवसांचा या स्पर्धकांचा प्रवास या शोमध्ये पाहणं रंजक ठरतोय. यंदाचं हे पाचवं पर्व विशेष धुमाकूळ घालताना दिसत आहे. यंदाच्या या पर्वात केवळ कलाकार मंडळीच नव्हे तर रॅपर, गायक, रील स्टार अशी विविध क्षेत्रातील मंडळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आलेली दिसत आहेत. या पर्वात स्पर्धक मंडळी तुफान राडा करताना दिसत आहेत. आतापर्यंतचे हे चार आठवडे स्पर्धकांनी विशेष गाजवले आहेत. एकापेक्षा एक असलेले हे वरचढ ठरणारे स्पर्धक स्वतःला शोमध्ये सिद्ध करताना दिसत आहेत. आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे स्पर्धक तुफान राडे करताना दिसत आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वातील स्पर्धकांवर आळा घालण्यासाठी होस्ट म्हणून रितेश देशमुखला पाहणं रंजक ठरत आहे. रितेश देशमुखने यंदाच्या या नव्या पर्वाच्या होस्टिंगची जबाबदारी सांभाळली आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश स्पर्धकांची शाळा घेताना दिसला आहे. गेले तीन आठवडे भाऊच्या धक्क्याने अक्षरशः गाजवले. रितेशने भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांची चांगलीच कानउघडणी केली. आणि स्पर्धकांपर्यंत महाराष्ट्राचा पाठिंबा पोहोचवला.
आता चौथ्या आठवड्यातील हा भाऊचा धक्काही गाजताना दिसणार आहे. नुकताच चौथ्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्याचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये रितेश देशमुख मागील आठवड्यात झालेल्या स्पर्धकांच्या चुकांवर त्यांची शाळा घेताना दिसणार आहे. या आठवड्यात जान्हवी किल्लेकरकडून खूप मोठी चूक झाली. टास्कदरम्यान जान्हवीने पॅडी कांबळेचा अपमान केला. पॅडीला त्याच्या कारकिर्दीवरुन तिने सुनावलं. हे अनेकांना खटकलं. अभिनेत्याला ओव्हर ऍक्टिंग करत असल्याचा टॅग देताच जान्हवी बरीच ट्रोल झाली.
नंतर जान्हवीने पॅडी कांबळेची माफी मागितली. तर हे प्रकरण आज पुन्हा भाऊच्या धक्क्यावर येणार असून रितेश जान्हवीची कशी शाळा घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. तर याव्यतिरिक्त निक्की-अरबाजची दादागिरीवरही रितेश काय स्टॅन्ड घेणार हे पाहणं आजच्या भाऊच्या धक्क्यावर रंजक ठरेल. आजचा रितेश देशमुखचा भाऊचा धक्का घरातील स्पर्धकांना काय धक्का देणार हे पाहणं औत्स्युक्याचे ठरणार आहे.