Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागाची सुरुवात अभिजीत आणि निक्की यांच्याबाबतच्या चर्चेने होते. दोन्ही टीमला ही मैत्री खटकत असते. हे दोघे नेमके कोणाच्या टीममध्ये आहेत, याचाच अंदाज कोणाला लागत नसतो. पंचवीसाव्या दिवशी निक्कीचा वाढदिवस असतो, रात्री बारा वाजता अरबाज तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. दिवशीही निक्की आणि अभिजीत यांच्या मैत्रीचा विषय सर्वांमध्ये चघळला जातो. अरबाज तर गंमतीने असंही म्हणतो की, ए आणि बी टीम अभिजीत आणि निक्कीची आहे, बाकीचे सगळे सी टीममध्ये आहेत. दुसऱ्या दिवशीही निक्की अरबाजवर या गोष्टीवरुन राग काढते. निक्की म्हणते की इरिनाबद्दल आता तोंडातून शिव्या निघतील. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
निक्की इरिनाला उद्देशून रागाने म्हणते की, ‘बरं झालं झाली नॉमिनेट, ही एलिमिनेट पण झाली पाहिजे.’ तेव्हा वैभव असं म्हणतो की, ‘अति होतंय निक्की आता.’ निक्की त्यावर उत्तर देते की, ती त्यांच्या ग्रुपमध्ये आधीपासून नव्हती, ती नंतर आली. वैभव निक्कीला प्रत्युत्तर देतो की, तो असलं काहीतरी फालतू ऐकून घेणार नाही. निक्की त्याला म्हणते की, ‘मी तुला बोलले नाही, मी इरिनाला बोलले.’ वैभव निक्कीला तोंड बंद ठेवायला सांगतो. तेव्हा ती रागाने त्याला म्हणते की, ‘मी तुला घरातून पीए म्हणून नाही घेऊन आले’. अरबाज तिला समजवायला जातो तेव्हा समोर टेबलवर असणारी काही ताटं आणि चमच्यांना लाथ मारते.
यानंतर अरबाज निक्कीची समजूत काढत असताना वैभवने तिच्याशी केलेल्या भांडणामुळे ती चिडून इरिनाबद्दल बोलली असल्याचे म्हणते. यानंतर वैभव तिथे येतो. जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत त्याला झेलावं लागेल, मी त्याच्यामागेच पडेल” असं म्हणते. हे ऐकल्यानंतर वैभव येतो आणि तिच्याबरोबर हुज्जत घालतो. यावरून त्यांच्यात जोरदार भांडण सुरू होतं. यावेळी निक्की मी या घरची मालकीण आहे. या घरची कॅप्टन आहे, म्हणजेच मी या घरची मालकीण आहे असं म्हणते. यावर वैभव तिला “कॅप्टन्सी तुला भीक म्हणून मिळाली आहे” असं म्हणते.
पुढे त्यांच्यात एकमेकांना आदर देण्यावरून भांडण सुरू होतं. तेव्हा अरबाजही निक्कीला आपल्याला आदर दिलाच पाहिजे असं म्हणते. तेव्हा वैभव तिला बोलताना असं म्हणतो की, “ही जर आदर देत नसेल तर ती माझ्या पायाखाली” असं म्हणते. यावर निक्कीही वैभवला “हो, मी तुझ्या पायाखालीच आहे. मी मान्य करते”. यानंतर वैभव तिला “आदर दिला तर मिळेल नाही तर नाही” असं म्हणतो. यावर निक्कीही त्याला “मला तुला आदर नाही द्यायचा. कोण आहे तू” असं म्हणते. यापुढे त्यांच्यात वाद होताच निक्की त्याला “मी तुझा आदर मिळवायला इथे आली नाही. मला जनतेचा आदर हवा आहे” असं म्हणते.