शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बायको असावी तर अशी! Bigg Boss Marathi मधील रितेशच्या कामाचं जिनिलीयाकडून कौतुक, म्हणाली, “प्रिय नवरा तू खूप …”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 9, 2024 | 10:51 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 Riteish Deshmukh wife Genelia praised and said that she is proud of him.

Bigg Boss Marathi मधील रितेशच्या होस्टिंगचं लाडक्या बायकोकडून कौतुक, अभिमान वाटत असल्याची भावना केली व्यक्त

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला दणक्यात सुरुवात झाली असून या शोचा आजचा तेरावा दिवस आहे. हा शो हळहळू प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या नवीन पर्वाची सुरुवातच भांडणांनी व वादांनी झाली. निक्की व वर्षाताईंमधले राडे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. यानंतर रितेशने निक्कीला सुनावत माफीही मागायला लावली. मात्र घरात पहिल्या दिवसापासून घरातील स्पर्धकांमध्ये वादावादी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. एकामागून एक स्पर्धक वाद घालत आहेत. घरातील वाद जसे चर्चेत आहेत, तसच घरातील प्रेमकहाण्यादेखील चर्चेत आहेत.  ‘बिग बॉस मराठी’च्या घरात शुक्रवारी टीव्ही टास्क पार पडला. (Bigg Boss Marathi 5 Update)

‘बिग बॉस’ टीव्ही चॅनलवर घरातील सदस्य धमाकेदार परफॉर्मन्स सादर करताना दिसले. घन:श्याम हे सर्व परफॉर्मन्सचं परिक्षण करताना दिसले. त्यामुळे कालचा भाग खूपच रंजक झाला. त्यामुळे प्रेक्षकांकडूनही हा शो मोठ्या प्रमाणात पाहिला गेला. आतापर्यंतच्या पर्वातील सर्वात मोठी सीझन ओपनिंग ही कालच्या भागाची झाली. यानिमित्त रितेशने सर्वांचे आभार मानले आहेत. रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमध्ये २.४ TVR रेटिंग आलं आहे. TVR हे टेलिव्हिजन रेटिंगचे एक प्रेक्षक मोजमाप आहे. हे टीव्ही कार्यक्रम पाहणाऱ्या मूळ लोकसंख्येची टक्केवारी दर्शवते. TVR हा एखादा प्रदेश किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये असलेला लक्ष्य प्रेक्षक असतो.

आणखी वाचा – 09 August Horoscope : ‘नागपंचमी’च्या दिवशी ‘या’ राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार, नोकरी, व्यवसाय व शिक्षणात होणार फायदे

याचनिमित्त रितेशची पत्नी जिनिलीयाने रितेशचे कौतुक केलं आहे. जिनिलीयाने रितेशसाठी पोस्ट शेअर केली असून “हे खूपच भारी आहे. प्रिय नवरा मला तुझा खूप अभिमान आहे” असं म्हणत त्याचे कौतुक केलं आहे. तसंच याबरोबर तिने “रोज रात्री ९ वाजता माझ्यासाठी फक्त बिग बॉस मराठी” असंही म्हटलं आहे. रितेश-जिनिलीया ही जोडी मराठी मनोरंजन क्षेत्रासह हिंदी मनोरंजन क्षेत्रातीलही एक लोकप्रिय जोडी आहे. हे दोघं कायम एकमेकांना त्यांच्या कामासाठी पाठींबा देत असतात. तसंच एकमेकांच्या कामाचं कौतुकही करत असतात.

आणखी वाचा – Keshavrao Bhosale Theatre Fire : ऐतिहासिक वारसा असलेले केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक, कलाकारांना अश्रू अनावर, नेमकं काय झालं?

अशातच जिनिलीयाने रितेशच्या बिग बॉस मराठीच्या पहिल्या होस्टिंगनिमित्त कौतुक केलं आहे. गेल्या आठडव्यात रितेशने केलेल्या होस्टिंगचं प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात आलं होतं. गेल्या आठडव्यात त्याने घरातील स्पर्धकांचा चांगलाच समाचार घेतला होता. अशातच आता येत्या आठडव्यात तो काय बोलणार? याकडे चाहत्यांचे लक्षलागून राहिलं आहे.      

Tags: Bigg Boss Marathi 5 Host Riteish Deshmukhgenelia deshmukhriteish deshmukh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Next Post
Tharal Tar Mag Serial Update

Tharal Tar Mag Serial : प्रतिमाच्या खोट्या डेड बॉडीच्या प्रकरणाचा खुलासा, प्रिया-नागराजचं सत्य उघडकीस येणार?, सायली-अर्जुनमध्ये पुन्हा वाद

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.