शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अंकिताला बेडवर चढून खेचलं, अभिजीतच्या अंगावर गेला अरबाज, Bigg Boss Marathi 5 च्या घरात हरवली मानसिकता

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 5, 2024 | 12:22 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Paddy, Abhijeet, Arbaaz, Ankita, Nikki and Janhvi fight for task

Bigg Boss Marathi 5 करन्सी टास्कवरुन 'बिग बॉस'च्या घरात राडा, पॅडी, अभिजीत, अरबाज एकमेकांना भिडले, अंकिता निक्की जान्हवीमध्येही जुंपली

‘बिग बॉस’चे घर आणि घरातील भांडणं हे समीकरण ‘बिग बॉस’च्या प्रत्येक पर्वात पहायला मिळतं. घरात प्रत्येक दिवशी स्पर्धकांमध्ये काहीना काही कारणावरुन भांडणं आणि वाद हे होतच असतात. गेल्या आठवड्यात वर्षा-निक्की व आर्या-जान्हवी यांच्यात झालेले राडे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील पहिला आठवडा चांगलाच गाजला. पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर पडले. आता दुसऱ्या आठवड्यातही १५ सदस्यांची ‘कल्लाकारी’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्या आठवड्यात जे सदस्य शांत होते ते सदस्य कदाचित दुसऱ्या आठवड्यात भिडताना दिसून येतील. त्यामुळे ‘बिग बॉस’प्रेमींचं नॉन स्टॉप मनोरंजन होणार आहे. 

अशातच आता ‘बिग बॉस’च्या एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्यात घरातील सगळेच स्पर्धक एकमेकांमध्ये जोरदार भिडलेले पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस’ने दिलेल्या नवीन currency टास्कवरुन या सदस्यांमध्ये भांडण झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच आलेला हा प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या प्रोमोमध्ये घरातील लाइट्स बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’ने घरातील स्पर्धकांना रात्री हा नवीन टास्क दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : “ए फालतू”, जान्हवी किल्लेकर व सूरज चव्हाणमध्ये तुफान राडा, धमकीही दिली अन्…; ‘गुलिगत’ हिसका दाखवणार

या नवीन प्रोमोवरुन ‘बिग बॉस’ने घरातील स्पर्धकांना ‘बिग बॉस’ currency शी संबंधित काहीतरी टास्क दिल्याचे कळत आहे. यावरुन घरातील स्पर्धकांमध्ये currency वरुन जोरदार वाद होतात आणि या वादामध्ये सर्वांचाच पारा चढतो. यांमध्ये गेल्या आठवड्यात शांत असलेले पॅडीही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर अभिजीतलादेखील त्याला राग अनावर झाल्याचे या प्रोमोमधून दिसून येत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 च्या घरात पॅडीने काढली घन:श्यामची लाज, वेडाही म्हणाला, ‘छोटा पुढारी’ला राग अनावर, म्हणाला, “ध्यानात ठेवा की…”

दरम्यान, या नवीन प्रोमोमध्ये प्रेक्षक एकमेकांना धक्काबुक्की करत असून currency टास्कसाठी घरातील सर्वच स्पर्धकांमध्ये हाणामारी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या टास्कमध्ये कोण कुणावर भारी पडणार? कोण कुणाला धक्काबुक्की करणार? आणि नेमका कुणामध्ये कसा राडा होणार? हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.         

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Marathi NewsBigg Boss Marathi 5 News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
shahrukh khan married life

लग्नाच्या पहिल्याच रात्री सुप्रसिद्ध अभिनेत्रीने गोंधळ घातला अन्…; शाहरुख खान व गौरीमध्ये होते मोठे वाद, म्हणालेला, "पश्चाताप झाला कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.