Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं घर म्हटलं की सततचे वाद, विवाद, प्रेम हे सारं होताना दिसतं. १०० दिवसांचा या स्पर्धकांचा प्रवास या शोमध्ये पाहणं रंजक ठरत आहे. यंदाचं हे पाचवं पर्व विशेष धुमाकूळ घालताना दिसत आहे. यंदाच्या या पर्वात केवळ कलाकार मंडळीच नव्हे तर रॅपर, गायक, रील स्टार अशी विविध क्षेत्रातील मंडळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आलेली दिसत आहेत. या पर्वात स्पर्धक मंडळी तुफान राडा करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात बरेचदा स्पर्धक मंडळी एकमेकांबद्दल गॉसिप करतानाही दिसतात.
‘बिग बॉस मराठी’च्या या नव्या पर्वात स्पर्धकांचे दोन गट पडलेले पाहायला मिळतात. टीम ए व टीम बी मध्ये प्रत्येक टास्क दरम्यान तुफान राडा होताना पाहायला मिळत आहे. अशातच नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये टीम बी मधील स्पर्धक एकमेकांशी इतर स्पर्धकाबाबत गॉसिप करताना दिसत आहेत. टीम बी मधील स्पर्धकांना अभिजीतच वागणं खटकताना दिसत आहे. त्यावरुन डीपी व पॅडी अभिजीतबाबत गॉसिप करताना दिसत आहेत.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, धनंजय असं बोलताना दिसत आहे की, “तो दोन्ही पद्धतीने बोलला. आणि अंकितासुद्धा हेच बोलली. तेव्हा अभि म्हणाला तुला हे कशाला लागतंय”. यावर पॅडी म्हणाला, “हा नंतर घात करणार आपला”, असं बोलताना दिसत आहे. किचनमध्ये जेवण करताना अभिजीत व निक्की बोलत असतात तेव्हा निक्कीने विचारलेल्या प्रश्नाचे अभिजीत सरळ उत्तर न देता तिचा मान राखून तिला घाबरून उत्तर देतो.
अभिजीत व निक्कीचा हा संवाद झाल्यानंतर अंकिता अभिजीतला याबद्दल विचारते. तेव्हा तो मी तेच म्हणालो असं म्हणते. यावरुन आता टीम बी मध्ये पुन्हा एकदा कुजबुज सुरु झालेली पाहायला मिळत आहे. मध्यंतरीपासून टीम बी मधील स्पर्धकांना अभिजीतच वागणं खटकत असल्याचं दिसत होत. यावरुन भाऊच्या धक्क्यावर खुलासाही करण्यात आला.