‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाने साऱ्यांची उत्सुकता अधिक ताणली आहे. हे नवे पर्व जेव्हा येणार हे समजलं तेव्हापासून साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. धमाल, मस्ती, गॉसिपसह अनेक गोष्टी या नवीन पर्वात अनुभवायला मिळत आहेत. परंतु, यंदा शोमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंतचे ‘बिग बॉस मराठी’च्या चार पर्वांचं होस्टिंग दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केलं होतं. मात्र, आता ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख सांभाळणार आहे. (Bigg Boss Marathi riteish deshmukh fee)
‘बिग बॉस’च्या घरात नेते, अभिनेते यांसह रीलस्टार, कीर्तनकार, गायक सहभागी झाले आहेत. वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण हे स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात अक्षरशः धुमाकूळ घालताना दिसत आहेत.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : चक्क भांडी घासायचा कोकण हार्टेड गर्लला ट्रॉमा, ढसाढसा रडलीही अन्…; कसा निभाव लागणार?
विशेष म्हणजे, ‘बिग बॉस मराठी’चे हे नवं पर्व प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राइज घेऊन आले आहे ज्यामध्ये स्पर्धकांचा एक मनोरंजक समूह व चक्रव्यूह ही नवीन थीम तयार करण्यात आले आहे. स्पर्धक आता पहिल्याच आठवड्यात चुरशीची लढत लढताना दिसत आहेत. काहींना एकमेकांचं न पटल्याने भांडण, वाद सुरु झालेली पाहायला मिळत आहेत. आता ‘बिग बॉस मराठी’च्या या नव्या पर्वात विकेंड का वारमध्ये रितेश स्पर्धकांची कशी शाळा घेणार?, रितेश त्यांना काय विचारणार?, याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
मात्र ‘बिग बॉस मराठी’साठी रितेश देशमुख याने नेमकं किती मानधन घेतलं असेल याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. ‘Filmybeat ‘ने दिलेल्या माहितीनुसार ‘बिग बॉस मराठी’चे आधीचे पर्व होस्ट करण्यासाठी महेश मांजरेकर यांनी प्रति एपिसोड २५ लाख रुपये आकारले होते. तर ‘Filmybeat ‘ने या नव्या पर्वासाठी रितेश नेमकं किती मानधन घेतो याबाबतचा खुलासा केला आहे. रितेश प्रत्येक एपिसोडसाठी २५ लाखांपेक्षा जास्त रक्कम आकारण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कदाचित रितेशकडून प्रत्येक एपिसोडसाठी सुमारे ३०-४० लाख रुपये आकारले जातील अशी शक्यता त्यांनी वर्तविली आहे.