पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या स्पर्धेत भारताने बाजी मारलेली पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी करत इतिहास रचला आहे.स्वप्निलने ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशन स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. खाशाबा जाधवनंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू हा स्वप्नील ठरला आहे. नेमबाजीतील या क्रीडा प्रकारात पदक पटकावणारा स्वप्नील एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. (Bollywood Celebrity On Swapnil Kusale)
स्वप्निलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विजयाचं सीमोल्लंघन केलं. त्यानंतर सोशल मीडियावर त्याचं भरभरुन कौतुक, अभिनंदन केलं जात आहे. कोल्हापुरात ठिकठिकाणी पेढे वाटून आणि फटाके फोडून स्वप्नीलच्या विजयाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्र स्वपिलचा गौरव करण्यात व्यस्त आहे. प्रत्येकजण स्वप्निलसाठी अभिमान व्यक्त करताना दिसत आहे. भारतासाठी, महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही स्वप्नीलसाठी पोस्ट शेअर करुन त्याचे अभिनंदन करत आहेत.
बॉलिवूड तसेच मराठी सेलिब्रिटींनीही स्वप्नीलचं कौतुक केलं आहे. या यादीत सिद्धार्थ मल्होत्रा, करीन कपूर, प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी, मीरा कपूर, किनारा अडवाणी, क्रांती रेडकर या कलाकारांचा समावेश आहे. सिद्धार्थ मल्होत्राने त्याची इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत स्वप्नील कुसळेचे अभिनंदन केले आहे. अभिनेत्याने ही स्टोरी शेअर करत असं म्हटलं आहे की, “स्वप्नील कुसळे, तू भारताचा गौरव केला आहेस. आणखी एक पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन”. तर करीनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वप्निलचा मॅडलबरोबरचा एक फोटो शेअर करत खेळाडूचे अभिनंदन केले आहे.
शिल्पा शेट्टीनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत, “एक अतुलनीय कामगिरी. किती अप्रतिम कामगिरी आहे स्वप्नील, तू भारताचा अभिमान वाढवला आहेस”, असं म्हणत त्याच कौतुक केलं आहे. तर प्रिती झिंटाने असे लिहिले आहे की, “स्वप्नील कुसळेने कांस्यपदक जिंकून इतिहास रचल्याबद्दल अभिनंदन. हे तर महान यश”, असं म्हणत त्याच भरभरुन कौतुक केलं आहे. तर अभिनेत्री क्रांती रेडकर हिने ही इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत, “सरपंच ताई अभिनंदन. आम्हाला स्वप्नीलचा अभिमान आहे”, असं म्हटलं आहे.