Bigg Boss Marathi 5 Updates : ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाने साऱ्यांची उत्सुकता वाढविली आहे. सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’ची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. यंदाच्या नव्या पर्वाचे बिगुल वाजताच अगदी धमाकेदार अशी सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. या पर्वात दमदार स्पर्धकही पाहायला मिळत आहेत. एकापेक्षा एक असलेल्या स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. दरम्यान, अगदी पहिल्या दिवसांपासून स्पर्धकांमध्ये मतभेद सुरु झालेले पाहायला मिळाले. हे मतभेत पाहून आता अनेकांनी यावर वाचा फोडलेली दिसली.
‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वावर टिप्पणी करणाऱ्या कलाकारांपैकी उत्कर्ष शिंदे हा एक आहे. ‘बिग बॉस मराठी’चा माजी स्पर्धक उत्कर्ष शिंदे ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या भागापासून त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. वर्षा उसगांवकर व निक्की तांबोळी यांच्यातील वादही उत्कर्षला काही पटला नाही. तेव्हा त्याने स्टोरी पोस्ट करत वर्षा यांना पाठिंबा दर्शविला. उत्कर्षचं नव्हे तर अनेक मराठी कलाकारांनीही निक्की तांबोळीच्या विरोधात आणि वर्षा उसगांवकरच्या समर्थनात भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – हनिमूनवरुन घरी परतले अधिपती-अक्षरा, भूवनेश्वरीला घराबाहेर काढल्याचे सत्य समजताच वडिलांची कॉलर पकडली अन्…
उत्कर्षने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वर्षा उसगांवकर मेकअप करताना दिसत आहेत. तर जान्हवी किल्लेकर, योगिता चव्हाण, निखिल दामले, धनंजय पोवार हे स्पर्धक त्यांना पाहत आहेत. हा फोटो शेअर करत उत्कर्षने घरातील इतर स्पर्धकांना टोला लगावला आहे. उत्कर्षने स्टोरीला फोटो शेअर करत, “त्या खेळत आहेत तुम्ही फक्त तोंड बघा”, असं म्हटलं आहे. उत्कर्षची ही स्टोरी वर्षा उसगांवकर यांच्या समर्थनार्थ आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : चक्क भांडी घासायचा कोकण हार्टेड गर्लला ट्रॉमा, ढसाढसा रडलीही अन्…; कसा निभाव लागणार?
समोर आलेला फोटो ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील असून जेव्हा ‘बिग बॉस’ स्पर्धकांना एकत्र लिव्हिंग एरियामध्ये बोलावतात त्यावेळी वर्षा उसगांवकर यांना तिथवर पोहोचण्यास उशीर होतो. वर्षा यांचं हे वागणं घरातील सर्व स्पर्धकांना खटकतं. त्यावरुन सगळेच स्पर्धक त्यांना बोलावू लागतात. अशातच आता पहिल्याच दिवशी वर्षा व स्पर्धकांमध्ये वाद झालेला पाहायला मिळाला.