Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी ५’च्या महाअंतिम सोहळ्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. येत्या ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता अवघ्या महाराष्ट्रासमोर येणार आहे. सध्या ‘बिग बॉस’च्या घरात एकूण ८ स्पर्धक आहेत. या स्पर्धकांमधूनच आता पुढील टॉप ५ स्पर्धक ‘बिग बॉस’ला मिळणार आहेत. त्यामुळे आता बिग बॉस च्या घरातील स्पर्धा अटीतटीची झाली आहे. नुकत्याच झालेल्या भागामध्ये टास्कचा महाबाप आला. अर्थात आजवर सर्वच स्पर्धक केव्हाही न खेळलेला गेम खेळले. ह्या खेळामध्ये सर्वच स्पर्धकांना अंतिम रक्कम जिंकण्यासाठी महाचक्रव्युहाचा टास्क खेळावा लागला. याचा टास्क दरम्यानचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
या महाचक्रव्यूह टास्कसाठी काही जोड्या करण्यात आलेल्या आहेत. याध्ये सूरज व पॅडी यांची जोडी करण्यात आलेली आहे आणि या दोघांमधील खास नाते प्रेक्षकांनी अनुभवले आहेच. हेच नाते आता त्यांना टास्कदरम्यान वापरायचे आहे. याचा एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात दोघेही टास्कसाठी मेहनत घेताना दिसून येत आहेत. कलर्स मराठीने सोशल मीडिया अकाउंटद्वारे सूरज व पॅडी यांच्या महाचक्रव्यूह टास्कच्या शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पॅडी सूरजला मार्गदर्शन करत आहेत.
पॅडी यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज हा टास्क पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना या प्रोमोमध्ये दिसून येत आहे. या टास्कसाठी मर्यादित वेळ नेमून दिली गेलेली असून या वेळेतच हा टास्क स्पर्धकांना पूर्ण करायचा आहे. त्यामुळे दिलेल्या अचूक वेळेत टास्क पूर्ण करण्यासाठी पॅडी सूरजला अगदी त्याला समजेल अशा भाषेत टास्कमध्ये मदत करत आहेत.
त्यामुळे आता या टास्कमध्ये पॅडी व सूरज बाजी मारणार का? हे येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान या प्रोमोखाली अनेकांनी सुरज व पॅडी यांच्या खेळाचे कौतुक केलं आहे. ते टास्कसाठी घेत असलेली मेहनत पाहून प्रेक्षक या स्पर्धकांना अंतिम लढतीत पाहत आहेत. नेटकऱ्यांनी अशा अनेक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.