मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi 5 चा महाचक्रव्यूह टास्क जिंकण्यासाठी पॅडी व सूरज यांची दमछाक, बाजी मारणार का?

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 26, 2024 | 9:41 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new promo paddy kamble and suraj chavan struggle for mahachakravyuh task see the details

Bigg Boss Marathi 5 चा महाचक्रव्यूह टास्क जिंकण्यासाठी पॅडी व सूरज यांचे शर्थीचे प्रयत्न

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी ५’च्या महाअंतिम सोहळ्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. येत्या ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता अवघ्या महाराष्ट्रासमोर येणार आहे. सध्या ‘बिग बॉस’च्या घरात एकूण ८ स्पर्धक आहेत. या स्पर्धकांमधूनच आता पुढील टॉप ५ स्पर्धक ‘बिग बॉस’ला मिळणार आहेत. त्यामुळे आता बिग बॉस च्या घरातील स्पर्धा अटीतटीची झाली आहे. नुकत्याच झालेल्या भागामध्ये टास्कचा महाबाप आला. अर्थात आजवर सर्वच स्पर्धक केव्हाही न खेळलेला गेम खेळले. ह्या खेळामध्ये सर्वच स्पर्धकांना अंतिम रक्कम जिंकण्यासाठी महाचक्रव्युहाचा टास्क खेळावा लागला. याचा टास्क दरम्यानचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. (Bigg Boss Marathi 5 New Promo)

या महाचक्रव्यूह टास्कसाठी काही जोड्या करण्यात आलेल्या आहेत. याध्ये सूरज व पॅडी यांची जोडी करण्यात आलेली आहे आणि या दोघांमधील खास नाते प्रेक्षकांनी अनुभवले आहेच. हेच नाते आता त्यांना टास्कदरम्यान वापरायचे आहे. याचा एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात दोघेही टास्कसाठी मेहनत घेताना दिसून येत आहेत. कलर्स मराठीने सोशल मीडिया अकाउंटद्वारे सूरज व पॅडी यांच्या महाचक्रव्यूह टास्कच्या शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पॅडी सूरजला मार्गदर्शन करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Video : देवाच्या दारात सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रींची आजीबाईंबरोबर फुगडी, गाभाऱ्यात पारंपरिक थाट, व्हिडीओ व्हायरल

पॅडी यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज हा टास्क पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना या प्रोमोमध्ये दिसून येत आहे. या टास्कसाठी मर्यादित वेळ नेमून दिली गेलेली असून या वेळेतच हा टास्क स्पर्धकांना पूर्ण करायचा आहे. त्यामुळे दिलेल्या अचूक वेळेत टास्क पूर्ण करण्यासाठी पॅडी सूरजला अगदी त्याला समजेल अशा भाषेत टास्कमध्ये मदत करत आहेत.

आणखी वाचा – 26 September Horoscope : मेष व मीन राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस नफ्याचा, नोकरी व व्यवसायात होणार भरभराट, जाणून घ्या…

त्यामुळे आता या टास्कमध्ये पॅडी व सूरज बाजी मारणार का? हे येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान या प्रोमोखाली अनेकांनी सुरज व पॅडी यांच्या खेळाचे कौतुक केलं आहे. ते टास्कसाठी घेत असलेली मेहनत पाहून प्रेक्षक या स्पर्धकांना अंतिम लढतीत पाहत आहेत. नेटकऱ्यांनी अशा अनेक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

Tags: bigg boss marathi 5Pandharinath KambleSuraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 nikki tamboli crying

Bigg Boss Marathi : …अन् निक्की रडली! टास्कदरम्यान घडली मोठी चूक, कमावली फक्त ‘इतकी’ रक्कम, नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.