‘झी मराठी’ वाहिनी नेहमीच काही ना काही आशयघन विषय घेऊन नवनवीन मालिका घेऊन येत असते. सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. या मालिकांच्या यादीत आता आणखी एका वेगळ्याच आणि आशयघन विषयावर आधारित एक नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. झी मराठी वाहिनीवर नुकतीच ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका सुरु झाली आहे. मालिकेच्या प्रोमोने या मालिकेचे उत्सुकता अधिक ताणून धरलेली पाहायला मिळाली. (Sawlyachi Janu Sawli Shooting Seen)
सावली नावाच्या मुलीची जी रंग रूपाने साधारण, पण स्वभावाने प्रेमळ, शब्दाची पक्की आणि अत्यंत सुरेल आवाजाची, तिची ही कथा आहे. या मालिकेत सुलेखा तळवलकर, वीणा जगताप, साईंकित कामत, गौरी किरण अश्या तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. या मालिकेचं अजून एक विशेष आकर्षण असणार आहे ते म्हणजे या मालिकेत अभिनेत्री मेघा धाडे एका मत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. जवळपास १३ वर्षांनी वर्षानंतर मेघा पुन्हा मराठी डेली सोप मध्ये दिसणार आहे.
आणखी वाचा – बार्बी थीम बेडरुम, प्रशस्त हॉल, आकर्षक इंटेरियर अन्…; आतून असं आहे मायरा वायकुळचं घर, पाहा Inside Video
मेघाचं हे मालिकेतील पात्र हे खलनायक असल्याचं दिसत आहे. मेघाला खलनायिकेच्या भूमिकेत बघून तिच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. प्रोमो पाहून सगळेच तिचं भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत. मेघा धाडे हिने ‘बिग बॉस मराठी’ सीझन १ च्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर नाव कोरले. तेव्हापासून मेघा नेहमीच चर्चेत राहिलेली दिसली. आता मेघा या मालिकेतून महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi ची विजेता रक्कम मिळवण्यासाठी सदस्यांना खेळावा लागणार मोठा टास्क, एखादी चूक घडली तर….
अशातच या मालिकेतील कलाकारांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. शूटिंगदरम्यानच्या या व्हिडीओने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. सासवड येथे सोपानदेव मंदिर या ठिकाणी मालिकेचं शूट करतानाचा हा आगळावेगळा अनुभव कलाकारांनी घेतलेला पाहायला मिळाला. या मंदीरात प्राप्ती रेडकरने फुगडी घातली, तर मेघा धाडेने वयोवृद्ध आजीसह फुगडी घातलेली पाहायला मिळाली. मालिकेचं चित्रीकरण करताना हा भाग्याचा अनुभव त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर केला आहे.