शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “जळू नका तोंड करपून जाईल”, सूरजची पॅडीला डायलॉगबाजी, वर्षा उसगांवकरांनी बोलावताच ड्रामा अन्…

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 4, 2024 | 5:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new promo

Bigg Boss Marathi 5 मधील पॅडी व सूरज यांचा खास बॉण्ड, नवीन प्रोमो व्हायरल

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वात सध्या एक स्पर्धक सर्वांच्याच पसंतीस उतरताना दिसत आहे आणि हा स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण. आपल्या साध्या व सोप्या राहणीमानाने सूरजने घरातील सदस्यांबरोबरच घराबाहेरील प्रेक्षकांचीही मनं जिंकली आहेतव. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासूनच सूरजने अनेकांची मनं जिंकली आहेत.  सूरजचं या घरातील प्रत्येक स्पर्धकाबरोबर चांगलंच जमतं. या घरात त्याचे कुणाशीही मतभेद किंवा वाद नसून त्याने केलेल्या प्रत्येक कृतीचे कौतुक केलं जातं. घरात आल्यापासून तो ‘टीम बी’बरोबर राहत आहे. त्यामुळे या टीममधील सर्वांबरोबर त्याचं चांगलंच जमतं. अशातच मंगळवारच्या भागात पॅडी व सूरज यांचा खास बॉण्ड दिसून आला. (Bigg Boss Marathi 5 New Promo)

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरजने सर्वांबरोबर चांगलाच बॉण्ड तयार केला आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीबरोबरचा त्याचा बॉण्ड खास आहे आणि हे वेळोवेळी प्रेक्षकांना पाहायलादेखील मिळाले आहे. धनंजय, अभिजीत, पॅडी व अंकिता यांच्याबरोबर त्याचं खास नातं तयार झालं असून या प्रत्येकाबरोबरचे खास क्षण प्रेक्षकांनी अनुभवले आहेत. अशातच नुकत्याच आलेल्या नवीन प्रोमोमध्येदेखील पॅडी व सूरज यांची मजामस्ती पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे हा पॅडी व सूरज यांचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Navri Mile Hitlerla च्या सेटवर लीला झाली कॅमेरामन, स्वत:च शूट करत आहे मालिकेतील सीन, व्हिडीओ व्हायरल

या नवीन प्रोमोमध्ये वर्षा सूरजला जेवायला बोलवतात. तेव्हा पॅडी वर्षा यांना “एकट्यालाचं?” असा प्रश्न विचारतात. यावर वर्षा त्यांना “सॉरी पंढरीनाथ. जमलं तर मला माफ करा” असं म्हणतात. पुढे पंढरीनाथ “मला खूप वाईट वाटतं हो ताई. तुम्ही फक्त सूरजला हाक मारता”. यावर सूरज पॅडी यांना असं म्हणतो की, “का? जळताय माझ्यावर?” यानंतर पॅडी सूरजला असं म्हणतात की, “जा आता नाहीतर माझ्या छातीतली जळजळ वाढेल”. यावर सूरज त्यांना मस्करीत असं म्हणतो की, “जळू नका. करपून जाल. तोंड करपेल” असं म्हणतो.

आणखी वाचा – “त्या बाईच्या मनात…”, वर्षा उसगांवकरांना नडणार असल्याचं डीपीचं वक्तव्य, अंकिताने समजावूनही म्हणाला, “त्यांना रडवणार…”

बिग बॉस मराठीचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांनाही चांगलाच आवडला आहे. अनेकांनी लाइक्स व कमेंट्सद्वारे या व्हिडीओळा प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी कमेंट्स करत सूरज व पॅडी यांची मैत्री आवडली असल्याचे म्हटलं आहे. पॅडी दादा व सूरज चव्हाण खूप छान मनोरंजन करत आहेत, या दोघांचा बॉण्ड खूपच छान आहे, सुरजभाऊ आणि पॅडीदादा भारी केमीस्ट्री” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.          

Tags: bigg boss marathi 5Paddy aka Pandharinath KambleSuraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Kill, Call Me Bae, Tanaav 2 and The Perfect Couple series will be released in the coming weekend.

'किल' ते 'तणाव 2', या विकेण्डला अनुभवा मनोरंजनाची मेजवानी, क्राइम व थ्रिलर चित्रपटांचा खजिना, जाणून घ्या

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.