सध्या अनेकजण मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. दिवसेंदिवस ओटीटी प्रेक्षकांची संख्या वाढत आहे. वेबसीरिजबरोबरचं काही चित्रपटही ओटीटीवर रिलीज होत असतात. सप्टेंबर महिना सुरू झाला असून या महिन्यातही ओटीटीवर प्रेक्षकांना वेबसीरिज आणि चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. वेगवेगळ्या धाटणीचे अनेक चित्रपट व वेबसीरिज या महिन्यात ओटीटीवर रिलीज होणार आहेत. चला जाणून घेऊया, आगामी सीरिज व चित्रपटांबद्दल…
किल (Kill) : या वर्षातल अॅक्शन थ्रिलरपट किल (Kill) आता ओटीटीवर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. एका सत्य घटनेवर हा चित्रपटाची कथा आधारीत आहे. ट्रेनमध्ये दरोडा टाकण्यासाठी एक टोळी ट्रेनमध्ये शिरते. या दरोडेखोरांचा सामना भारतीय सैन्यातील जवान करतो. चित्रपटात राघव जुयाल, आशिष विद्यार्थी, हर्ष छाया, तान्या माणिकतला आणि अभिषेक चौहान आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागेश भट यांनी केले. येत्या ६ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी माध्यमावर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
कॉल मी बे (Call Me Bae) : ही एक रोमँटिक कॉमेडी वेब सीरिज आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे झळकणार आहे. कथा आधुनिक काळातील असून यामध्ये नातेसंबंधावर भाष्य करण्यात आले आहे. या वेब सीरिजमध्ये अनन्या पांडेसह वीर दास, गुरफतेह पिरजादा, वरुण सूद, विहान सामत, मुस्कान जाफेरी, निहारिका लिरा दत्त, लिसा मिश्रा आणि मिनी माथुर यांच्या भूमिका आहेत. ही सीरिज येत्या ६ सप्टेंबर रोजी अॅमेझोन प्राइम या ओटीटी माध्यमावर पाहता येणार आहे.
तणाव (Tanaav Season 2) : ‘तणाव’ या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनने चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता याच सीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘तणाव’ ही वेबसीरिज एका स्पेशल टास्क ग्रुपची गोष्ट आहे. दहशतवादाच्या विरोधात त्यांनी केलेल्या कारवाईचे चित्रण यात आहे. ‘फौदा’ या गाजलेल्या वेब सीरिजचे हे भारतीय रुपांतरण आहे. येत्या ६ सप्टेंबर रोजी सोनी लिव्हवर या ओटीटी माध्यमावर ही सीरिज प्रर्दशीत होणार आहे.
आणखी वाचा – Navri Mile Hitlerla च्या सेटवर लीला झाली कॅमेरामन, स्वत:च शूट करत आहे मालिकेतील सीन, व्हिडीओ व्हायरल
द परफेक्ट कपल (The Perfect Couple) : ‘द परफेक्ट कपल’ ही निकोल किडमन, लिव्ह श्रेबर, डकोटा फॅनिंग आणि इव्ह ह्यूसन यांची भूमिका असलेली एक आगामी अमेरिकन सस्पेन्स ड्रामा सीरिज आहे. एलिन हिल्डरब्रँडच्या त्याच नावाच्या 2018 च्या कादंबरीचे रूपांतर आहे. उद्या म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.