Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गेला आठवडा फारच रोमांचक ठरला. या आठवड्यात बरीच समीकरणं नव्याने जुळताना पाहायला मिळालं. तर जुळलेली समीकरणं तुटल्याचे देखील पाहायला मिळाले. अशातच भाऊचा धक्काही फार मजेशीर झाला. ‘भाऊचा धक्का’ सुरु झाल्यानंतर बिग बॉसने जोडीमध्ये लावलेले बेल्ट रितेश सोडण्याचे आदेश देतो. याशिवाय घन:श्याम दरवडेशी रितेशने धरलेला अबोलाही सोडला. मग रितेशने शॉकचा टास्क खेळला, त्याचबरोबर सर्व जोड्यांचे डान्सही बघितले. त्यानंतर स्पर्धकांचे सोशल मीडियावर व्हायरल मिम्सही दाखवले. त्यानंतर रितेशने सर्वांना मोठा धक्का दिला तो म्हणजे अंकिताच्या एलिमिनेशनचा. अंकिताचं एव्हिक्शन हे सर्वांसाठी धक्कादायक होतं. मात्र ती एक गंमत असल्याचेही रितेश नंतर सांगतो. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
गेल्या काही दिवसांपासून आर्या व अभिजीत यांचे मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहे. मागे एकदा एका टास्कमध्ये आर्याने अभिजीतच्या पायला दुखापत झालेली असताना ही त्याच्याऐवजी टास्क खेळला. त्यामुळे बी टीममध्ये तिच्याबद्दल नाराजी पाहायला मिळाली. त्याचमुळे अभिजीतने कधीही तिच्याबद्दल आत्मीयता दाखवली नाही आणि त्याचा त्याचा आर्याविषयीचा नाराजीच्या सुर आजच्या भागातही पाहायला मिळणार आहे. याबद्दल तो ‘टीम बी’मधील अंकिता व धनंजयबरोबर गॉसिप करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – वैभव मांगलेंच्या लेकीने पहिल्यांदाचं बनवला संपूर्ण स्वयंपाक, अभिमानाने म्हणाले, “लवकरच माझा मुलगाही…”
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात अभिजीत, अंकिता व धनंजय एकत्र बसलेले असतात. तेव्हा अभिजीत त्या दोघांना आर्याबद्दल असं म्हणतो की, “मी आर्याला फार entertain करत बसणार नाही. तिला आपण उगाच भाव देत आहोत, ज्याचा काही अर्थच नाही. ग्रुपमध्ये तिची काय किंमत होती हे सर्वांनाच माहीत आहे. ती मला बोलते की, पण ती स्वत: काय आहे हे तिने बघितलं पाहिजे. तिची किंमत कमी होती तेव्हा मी बोललो की, बाबा तिला किंमत द्या. तिचं म्हणणं पण ऐका. ही गोष्ट मी तिला बोललो आणि ती आज मला बोलतेय की, मी तिला किंमत देत नाहीये”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सूरज-जान्हवीने केली निक्की-अरबाजची नक्कल, डीपीनेही दिली साथ, इतर स्पर्धकांना हसू अनावर
यापुढे अंकिताही तिच्याबद्दल असं म्हणते की, “आम्हीही तिला entertain करत नाही. मी स्वत: तिला बोलली आहे की, जिथपर्यंत मी तुला समजावतेय तिथपर्यंत मी तुला समजवणार. त्याच्यापुढे समजावणार नाही आणि याबद्दल मी तिला अनेकदा बोललीदेखील आहे”. त्यामुळे आता या घरात आर्याविरुद्ध अभिजीत, अंकिता यांचा सामना पाहायला मिळणार असल्याचे दिसून येत आहे.