Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी ५’ च्या घरात कल्ला आणि राडा हा रोजच पहायला मिळत असतो. या घरात कुणी ना कुणी एकमेकांशी सतत भांडणच करत असतात. अशातच बिग बॉसच्या घरात नुकतेच एलिमिनेशन पार पडले आणि यात घरातील दोन सदस्यांना बाहेर पडावे लागले. हे दोन सदस्य म्हणजे निखिल दामले व योगिता चव्हाण. प्रेक्षकांच्या कमी वोटिंगमुळे या दोघांचा घरातील प्रवास संपला असून हे दोघे या घरातून बाहेर पडले आहेत. या दोघांच्या बाहेर येण्यानं आता टीम B कमकुवत झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
मात्र हे ‘बिग बॉस’चे घर आहे. इथे अचानक कुणाचेही फासे पालटू शकतात. घरात येणाऱ्या ट्विस्टमुळे या शोला खरी रंगत येत असते. अशातच आता या शोमध्ये एक नवीन ट्विस्ट येणार आहे आणि हा नवीन ट्विस्ट म्हणजे निक्की व अरबाज यांच्यातील भांडण. नुकताच या ट्विस्टचा एक प्रोमो प्रेखकांच्या भेटीला आला आहे, ज्यात या दोघांचे भांडण झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा नवीन प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरामध्ये पुन्हा प्रवेश करणार निखिल दामले?, म्हणाला, “सध्यातरी गुलदस्त्यात पण…”
या नवीन प्रोमोमध्ये निक्की अभिजीतला असं म्हणते की, “मी मनापासुन माफी मागत नाही असं तुला वाटतं का?” यावर अभिजीत असं म्हणतो की, “हो तू मनापासून माफी मागते”. अभिजीत व निक्की यांच्यातील बोलणं अरबाजला न पटल्याने तो निक्कीला “ही पण फिरत आहे. फिर भवऱ्यासारखी तू” असं रागात म्हणतो. यावरून निक्की व अरबाज यांच्यात कडाक्याचं भांडण होतं. या भांडणात तो “तू त्याच्याबरोबरच राहत जा, स्माईल करत बोलते” असं काहीतरी म्हणतो. यानंतर त्याचा स्वतःवरील ताबा सुटतो आणि तो जवळील वस्तू फेकून देत तिला अगदी रागात “जा इथून” असंही म्हणतो. तसंच या भांडणात घन:श्याम मात्र आपल्या निक्की ताईंच्या बाजूने अरबाजला ओरडताना दिसून येत आहे.
दरम्यान, अरबाज-निक्की मधील हे भांडण नक्की कशामुळे झाले आहे. त्यांच्या भांडणात नक्की चूक कुणाची आहे? आणि हे भांडण यापेल विकोपाला जाणार की लगेच सावरणार? हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. तसंच अरबाज-निक्की यांच्या भांडणाचा त्यांच्या ग्रुपवर काही परिणाम होणार का? हेही लवकरच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी भागासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत हे नक्की…