Paaru Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, ब्रॅण्ड अँबेसेडर कोण होणार यासाठी दिशा व पारूमध्ये अटीतटीची लढाई सुरु असते. दोघींनी आपापल्या परीने ही स्पर्धा जिंकण्यासाठी लढाई केलेली पाहायला मिळत आहे. सुरुवातीला पारूला ही स्पर्धा खेळायची नसते मात्र अहिल्यादेवींचा शब्द खाली पडू न देणे हे पारूचं मोठं कर्तव्य असल्याने पारू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तयार होते. सर्वानुमते दिशाला सर्वाधिक गुण मिळालेले असतात. दिशाला २९ गुण मिळतात तर इकडे पारूला १४ गुण मिळालेले असतात. त्यावेळेला अहिल्यादेवी श्रीकांतला विचारतात की, तू पारूला काहीच गुण का दिले नाही?, यावर सांगतो की, हो पारूला मी गुण दिले आहेत शून्य.
हे ऐकल्यावर सगळेच जण चकित होतात. श्रीकांत सर आणि पारूच्या बाबतीत असं करतील असं कोणालाच वाटलेलं नसतं. त्यानंतर श्रीकांत सांगतो की, शून्य या शून्य या शब्दाची किंमत शून्य या शब्दाची किंमत फार मोठी आहे. पारूने शून्यातून हे विश्व निर्माण केले म्हणजेच या शून्यात किती ताकद आहे हे तुम्हाला कळायला हवं. त्यामुळे हा पारूचा शून्य कुठे लावायचा हे आता मी ठरवणार. हे सांगून ते पुढे येतात आणि फळ्याजवळ जाऊन तो शून्य पारूच्या नावापुढे असलेल्या १४ गुणांच्या पुढे लावतात. एकूणच काय तर पारूला जास्त मत मिळालेली असतात. तर दिशाला कमी मत हे बघून दिशाचा पारा चढतो. दिशा यावर नको नको ते पारूला बोलू लागते आणि सांगते की, तुम्ही एका मोलकरणीला दुय्यम दर्जा देत आहात, हे अत्यंत चुकीचं आहे.
त्यानंतर अहिल्यादेवी समोर सगळी हकीगत आलेली असते की पारूला दिशाने तोकडे कपडे घालून फोटोशूट करायला लावलं जे तिच्या संस्कारात बसत नाही आणि जे तिनं कधी केलंही नाही. एक मॉडेल म्हणून ती तिच्याकडून काही करून घेईल याचा अधिकार कोणी दिला असं सगळं बोलून अहिल्यादेवींचा संताप वाढतो. अहिल्यादेवी दिशावर प्रचंड रागवतात. त्यावेळेला दिशा सांगते की, तुम्ही माझी बाजू सुद्धा ऐकून घ्यायला हवी. दिशा सांगते की, पारू एक मोलकरीण आहे आणि तुम्ही तिला इतकं महत्त्व का देताय. जे की मी या घराची होणारी सून आहे तरीसुद्धा माझं इथं काहीच वर्चस्व नाहीये हे सगळं ऐकल्यावर अहिल्यादेवींनाही शॉक बसतो.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरामध्ये पुन्हा प्रवेश करणार निखिल दामले?, म्हणाला, “सध्यातरी गुलदस्त्यात पण…”
दिशाचा मनात नेमकं काय चालू आहे हे अहिल्यादेवींच्या लक्षात येतं. दिशाच्याही मनात दामिनी प्रमाणे कपट असल्याचं त्यांना कळून चुकत त्यानंतर त्या बॅगा भरुन घरी जायला सांगतात. एकूण दिशाचा खरा चेहरा अहिल्यादेवी समोर आणि सर्वांसमोर आलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रीतमही इकडे खूप खुश असतो. तर किर्लोस्कर कंपनीचा खरा चेहरा म्हणून पारू असणार हे अहिल्यादेवी जाहीर करतात. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.