‘बिग बॉस मराठी’चे आतापर्यंत झालेले सर्वच पर्व बरेच गाजले आहेत. या ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझननंतर चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे अमृता देशमुख व प्रसाद जवादे. अमृता व प्रसाद हे दोन्ही स्पर्धक ‘बिग बॉस’च्या चौथ्या भागात पाहायला मिळाले. दोघांनी त्यांच्या त्यांच्यापरिने उत्तम खेळ खेळला. ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली. अमृता व प्रसादने अखेर लग्न केले. लग्नानंतर ही जोडी बरीच चर्चेत राहिलेली दिसली. सध्या प्रसाद पारू मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर अमृता रंगभूमी गाजवण्याबरोबरच अनेक व्हिडीओ शेअर करत अनुभव सांगताना दिसत आहे. अशातच अमृताने तिच्या युट्युब अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमृता ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमधील स्पर्धकांची उणीधुणी काढताना दिसत आहे. (Amruta Deshmukh On Bigg Boss Marathi)
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अमृता असं बोलताना दिसत आहे की, “‘बिग बॉस’च्या नव्या सीझनचा पहिला आठवडा झाला आहे. ‘बिग बॉस’च घर, ‘बिग बॉस’चा आवाज, घालून पाडणारी लोक, तो टास्क हे सगळं मी भोगलं असून मला हवंहवंसं वाटत आहे. १६ स्पर्धकांपैकी १५ जणांना हा ‘बिग बॉस’चा सेट तसाच दिसत आहे जसा आपल्याला दिसत हे पण एका व्यक्तीला आहे सेट संजय लीला भन्साळी यांचा सेट वाटत आहे. त्या म्हणजे वर्षा उसगांवकर ताई. त्यांचं मराठी अर्थात छान आहे. मात्र त्यांची हे बोलण्याची स्टाईल आहे, आणि मला ते छान वाटतं. आणि त्यांचं एक अजून आवडतं ते म्हणजे त्या निक्की तांबोळी म्हणजे राखी सावंत लाइटला त्या चांगलाच टफ देत आहेत.
पुढे अमृताने वर्षा ताई व निक्की यांच्या भांडणांबाबत भाष्य करत म्हटलं की, “वर्षा ताईचं बोलणं निक्कीला आवडत असलं, नसलं तरी तिची बोलण्याची पद्धत चूक आहे. थोडातरी आदर तिने द्यायलाच हवा. निक्की वर्षाताईंना वाटेल तसे बोलते तेव्हा वर्षा ताईंच्या बाजूने कोणी एक नसतं, याच खूप वाईट वाटतं. आणि निक्कीच्या अवतीभोवती १२ पॅक्स घेऊन फिरणारे वैभव व अरबाज. निक्कीचा अंदाज आपला आपला आहे पण या जान्हवी किल्लेदारच काय. असं वाटतं की निक्कीच्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म या जान्हवीने भरला आहे. आणि वर्षभराचे सगळे पैसे तिला लगेच हवे आहेत. आर्याने ‘बिग बॉस’माझ्यावर लक्ष ठेवून आहेत हे काही मला पटलं नाही. मग बाकीच्या लोकांवर फळ ठेवून आहेत का?. आर्या व जान्हवी हमखास म्हणतात की ‘बिग बॉस’ तुम्ही माझा नवरा आहात, तुम्ही माझा बॉयफ्रेंड आहात, तर त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही अजून या शोच्या पहिल्या आठवड्यात आहात. आर्या निक्की विरोधात बोलली मात्र पुन्हा ती त्यांच्याकडे गेली”.
पुढे अमृता असंही म्हणाली, “तर अभिजीत सावंतला कळत नव्हतं की नक्की कोणती ट्रेन पकडायची आहे. मात्र आता तो त्याची तिकीट काढून प्रवासाला लागेल असं मला वाटतं आहे. तर बाकी योगिता, अंकिता, पॅडी दादा, सूरज, घनःश्याम, इरिना ही सगळी लोक अजून फॉर्ममध्ये आलेली नाहीत. आता पुढे काय होतं याची उत्सुकता आहे”, असं म्हणत अमृताने ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांचा चांगलाच कान पिळला आहे.