शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धक्कादायक! एकाच दिवशी सुप्रसिद्ध अभिनेत्रीने आई व बहिणीला गमावलं, जगणंही झालं कठीण, असं काय घडलं?

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 27, 2024 | 4:02 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
American singer composer and actress Mariah Carey mother and sister have died on the same day.

मारिया कॅरीवर दु:खाचा डोंगर, एकाच दिवशी आई व बहिणीला गमावलं, नक्की काय झालं?

अमेरिकन गायिका, गीतकार आणि अभिनेत्री मारिया कॅरीबद्दल एक दु:खद बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पाच वेळा ग्रॅमी पुरस्कार पटकावणाऱ्या ५५ ​​वर्षीय गायिकेच्या आई आणि बहिणीचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. रविवारी घडलेल्या घटनेत गायिकेच्या आई व बहिणीचा मृत्यू झाल्यामुळे तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी घडलेल्या या घटनेत दुर्दैवाने गायिकेने तिच्या आई व बहिणीला गमावलं आहे. त्यानंतर सोमवारी ‘तुमच्या शिवाय’ अशी पोस्ट शेअर करत तिने तिच्या दु:खी भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच या ‘कठीण काळात लोकांनी तिच्या गोपनीयतेचा आदर करावा’ असे आवाहन करणारी एक पोस्टही तिने शेअर केली आहे. (Mariah Carey Mother And Sister Passed Away) 

‘पीपल्स मॅगझिन’ला दिलेल्या निवेदनात मारिया कॅरीने असं म्हटलं आहे की, “गेल्या आठवड्याच्या शेवटी मी माझी आई गमावली. याचे मला खूप दुःख झाले आहे. दुर्दैवाने माझ्या बहिणीलाही त्याच दिवशी आपला जीव गमवावा लागला. मी माझ्या आईच्या शेवटच्या क्षणी तिच्याबरोबर होते याबद्दल मला धन्यता वाटते. या अशक्य वाटणाऱ्या काळात मी सर्वांचे प्रेम आणि समर्थन तसेच माझ्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करते”. मात्र, या पोस्टमध्ये गायिकेने आई व बहिणीच्या निधनाबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मारियाचे वैयक्तिक आयुष्य हे खूप संघर्षमय होते. अशातच तिने आता तिच्या डोक्यावरील आईचे छत्रही हरपले आहे

View this post on Instagram

A post shared by Mariah Carey (@mariahcarey)

मारिया कॅरी फक्त ३ वर्षांची असताना तिचे आई-वडील विभक्त झाले होते. गायिकेचे वडील आल्फ्रेड रॉय कोरी यांचे २००२ मध्ये कर्करोगामुळे निधन झाले. मारियाने याआधी तिच्या २०२० च्या ‘द मीनिंग ऑफ मारिया कॅरी’ या आत्मचरित्रात तिच्या आईबरोबरच्या विस्कटलेल्या नात्याबद्दल खुलासा केला होता. त्यात मारियाने “माझ्या आयुष्यातील अनेक पैलूंप्रमाणेच माझा आईबरोबरचा प्रवास संघर्ष आणि तणावाने भरलेला आहे. आमचे नाते नेहमीच एका सावलीप्रमाणे राहिले”.

आणखी वाचा – Video : गिरगावच्या चाळीत दहीहंडीमध्ये मनसोक्त नाचायचे प्रदीप पटवर्धन, जुना व्हिडीओ व्हायरल, चाहतेही भावुक

तसंच मारिया कॅरीचे तिच्या भावंडांबरोबरचे संबंधही फारसे चांगले नव्हते. त्याचा भाऊ मॉर्गन केरी आणि त्याची दिवंगत बहीण ॲलिसन केरी यांच्याबरोबरच्या ताणलेल्या संबंधांबद्दलही तिने आपल्या आत्मचरित्रात विस्तृतपणे लिहिले मनःशांतीसाठी डॉक्टरांनी तिला या नातेसंबंध आणि कुटुंबाचा पुन्हा विचार करण्यास सांगितले होते. त्याच्या भावा-बहिणीकडूनही अपेक्षा होत्या, त्या कधीच पूर्ण झाल्या नाहीत.

आणखी वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळताच कलाकारांचा संताप, रितेश देशमुख म्हणाला, “राजे आम्हाला…”

दरम्यान, मारियाच्या वैयक्तिक आयुष्यात, मारिया स्वतः दोन मुलांची आई आहे. तिने दोनदा लग्न केले आणि दोन्ही वेळा घटस्फोट झाला आहे. याचबरोबर मारियाने तिच्या चाहत्यांसाठी एक संदेशही लिहिला आहे. त्याच्या कठीण काळात ज्यांनी त्याला साथ दिली त्या सर्वांचे तिने आभार मानले आहेत. गायिका मारिया केरीची आई सुद्धा तितकीच उत्तम गायिका होती.   

Tags: Mariah Carey mother and sister passed awayMariah Carey mother and sister passed away Marathi newsMariah Carey mother and sister passed away news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 arbaaz patel troll

Bigg Boss Marathi : "दोघांनाही घराबाहेर काढा", रागाच्या भरात अरबाजने घरातल्या वस्तू फेकून देताच प्रेक्षक भडकले, म्हणाले, "निक्की आणि याला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.