Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीजन सुरु होऊन आता जवळपास ३० दिवस उलटले आहेत. या घरात आल्याच्या पहिल्या दिवसापासून घरातील काही स्पर्धकांमध्ये मैत्री पहायला मिळाली तर काहींमध्ये मैत्रीतील प्रेम. मात्र आता तेच नाते हळूहळू बदलतानादेखील पहायला मिळत आहे. या घरातील नात्यांची समीकरण कधी बदलतील हे सांगू शकत नाही. आता जस-जसे दिवस पुढे जात आहेत, तसे सर्व सदस्यांचे खरे चेहरे समोर यायला लागले आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात टीम A मधील कायम एकमेकांना साथ देणारे अरबाज व निक्की आता वेगळे झालेले पाहायला मिळत आहे. निक्कीच्या विरोधात त्यांच्याच ग्रुपमधील सदस्य चक्रव्ह्यूहात बोलताना आढळले. त्यामुळे निक्कीने ग्रुप A सोडण्याचा निर्णय घेतला असून सध्या ती एकटीच खेळत आहे. त्यामुळे टीम A तुटला आहे. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
‘बिग बॉस’च्या घरात आता घरात दोन दोन स्पर्धकांच्या जोड्या करण्यात आल्या असून कोणी एकटं दिसलं तर मानकाप्या येणार अशी ताकीद ‘बिग बॉस’ने दिली आहे. कालच्या एपिसोडमध्ये अरबाज पटेलचा राग अनावर होत त्याने बिग बॉसच्या प्रॉपर्टीची तोडफोड केली. यामुळे त्याला कॅप्टन्सी मिळू शकणार नाही अशी शिक्षा सुनावण्यात आली. तर आता नुकतंच अभिजीत सावंताचेही रंग बदलल्याचं पाहायला मिळतंय. याचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे आणि या नवीन प्रोमोमध्ये त्याचे रंग बदलल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा – दयाबेन, तारक मेहता, टप्पू, गोलीनंतर मास्तर भिडेही ‘तारक मेहता…’ सोडणार?, अभिनेता म्हणाला, “दुःख झालं…”
‘बिग बॉस’च्या नुकत्याच आलेल्या नवीन प्रोमोमध्ये जोडीने एकत्र राहायचे सांगूनही अभिजीत एकटाच फिरताना दिसत आहे. यामुळे सूरज आणि घनःश्याम त्याला नियमाची आठवण करुन देतात. तेव्हा अभिजीत म्हणतो, “बिग बॉस मला सांगतील”. यानंतर आर्या येऊन अभिजीतला असं म्हणते की, “तू तुझेच शब्द बोलतोय की निक्कीचे शब्द बोलतोय. दोन दिवसात अभिजीत सावंत पूर्णपणे बदलला?”. तर दुसरीकडे निक्की अभिजीतला म्हणते, “चार दिवसात मी तुला ओळखलं आणि ते नाही ओळखू शकले?”
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात ज्यांच्या मैत्रीमुळे सर्वांना राग येत आहे. अभिजीत आणि निक्की यांची जोडी टीम A सह टीम B च्या सदस्यांना देखील खटकत आहे. अभिजीत B टीमचा असूनही त्याचं निक्कीबरोबर चांगलंच जमत आहे. त्यात जोड्या झाल्यापासून त्याला निक्कीची हवा लागल्याचं पाहायला मिळत आहे.