दिल्ली पोलिस हायबॉक्स मोबाइल ॲपशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी रिया चक्रवर्ती, कॉमेडियन भारती सिंग आणि यूट्यूबर एल्विश यादव यांची चौकशी करत आहेत. या प्रकरणी आणखी अनेक YouTubers आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना समन्स पाठवण्यात आले आहेत. व्याज परतावा देण्याचे आमिष दाखवून या लोकांनी हजारो लोकांना गंडा घातल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांना ५००हून अधिक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारदारांनी आवडत्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा आणि युट्यूबरचा व्हिडीओ पाहिल्यांनंतर संबंधित मोबाइल अॅपमध्ये गुंतवणूक केली होती.
त्यामुळे या प्रकरणी तब्बल ३० हजार लोकांची फसवणूक केल्याचा आरोप रिया, भारती आणि एल्विशसह काही इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबवर दाखल करण्यात आला आहे. ५०० कोटी रुपयांच्या हायबॉक्स मोबाइल अॅपच्या घोटाळ्यात रिया, भारती आणि एल्विशसह सौरव जोशी, हर्ष लिंबाचिया, अभिषेक मल्हान, दिलराज सिंह रावत, पूरव झा, लक्ष्य चौधरी, आदर्श सिंह आणि अमितसारखे युट्यूबर्सची नाव सामिल आहेत.
आणखी वाचा – Big Boss 18 मध्ये गुणरत्न सदावर्तेंची एन्ट्री, डायलॉगबाजी ऐकून सलमान खानला हसू अनावर, पाहा खास प्रोमो
‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना पोलीस आयुक्त हेमंत तिवारी म्हणाले, “हायबॉक्स एक मोबाइल अॅप्लिकेशन आहे, जे एका प्लॅनसह केलेला घोटाळ्याचा भाग आहे. आरोपींनी दररोज एक ते पाच टक्के आणि महिन्याला ३० ते ९० टक्के पैसे परत मिळण्याचे आश्वासन दिले होते. याप्रकरणातील मुख्य आरोपी शिवराम (वय ३०), जो चेन्नईत राहणार आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.”
आणखी वाचा – हार्दिकच्या वाढदिवसानिमित्त पत्नी अक्षयाची नवऱ्यासाठी रोमँटिक पोस्ट, म्हणाली, “माझ्या हास्याचे कारण…”
दरम्यान, पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की ते EasyBuzz आणि PhonePe या दोन पेमेंट प्लॅटफॉर्मची देखील चौकशी करत आहेत. कारण या ॲप्सनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केलेले नाही. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणी कुणावर नेमकी काय कार्यवाही केली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.