गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंकिता वालावलकरची ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून एक्झिट, टॉप चार सदस्यांमध्ये जिंकण्यासाठी चढाओढ

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 6, 2024 | 7:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5 ankita walavalkar exit

'बिग बॉस मराठी' सीझन ५ च्या घरातून अंकिता वालावलकर बाहेर

Bigg Boss Marathi Season 5 :  ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या पर्वाचा शेवटचा आठवडा सुरु असून आता ‘बिग बॉस मराठी’चा विजेता घोषित करण्यात येणार आहे. या पर्वाच्या ट्रॉफीवर कोणता स्पर्धक नाव कोरणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे. मात्र ‘बिग बॉस मराठी’च्या मिड वीक एलिमिनेशनने साऱ्यांच्या नजरा ताणून धरल्या आहेत. अशातच आज ‘बिग बॉस’च्या घरात मिड वीक एलिमिनेशन झालं. यामध्ये एका स्पर्धकाचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला आहे. हा स्पर्धक म्हणजे कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घेतली आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात शेवटच्या आठवड्यात निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर हे स्पर्धक शिल्लक होते. या स्पर्धकांपैकी तिकीट टू फिनाले मध्ये बाजी मारत निक्की तांबोळी ही ‘बिग बॉस’ सीझन ५ ची पहिली ग्रँड फायनलिस्ट ठरली आहे. त्यामुळे उर्वरित सहा स्पर्धक आता नॉमिनेट झाले असताना यांत मिड वीक एलिमिनेशन आल्याने स्पर्धकांना धक्का बसला. या मिड वीक एलिमिनेशनमध्ये कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिने एक्झिट घेतली आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : असा जावई हवा गं बाई! सासूबाईंनी अभिजीतसाठी शूट केला खास व्हिडीओ, म्हणाल्या, “आमच्या अभिजीतला तुम्ही…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अगदी पहिल्या दिवसापासून अंकिता वालावलकर हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. कोकणी भाषेवर प्रभुत्त्व असणाऱ्या अंकिताने तिच्या खेळीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. टीम बी मधील प्रत्येक स्पर्धकाशी अगदी पाहिल्यादिवसापासून ती लॉयल राहिली. शिवाय टीम बी मधून ती उत्तम खेळ खेळताना दिसली. प्रत्येक टास्कमध्ये अंकिता अगदी मेहनतीने खेळताना दिसली. घरातील अंकिताचा वावरही वाखाणण्याजोगा होता.

आणखी वाचा – Ude Ga Ambe : साडेतीन शक्ती पीठांपैकी एक माहूरच्या रेणुका मातेचं पुष्प येणार समोर, ‘उदे गं अंबे’ मालिकेची घोषणा

यंदाच्या ‘बिग बॉस’मध्ये रील स्टारल खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे. यंदा सुप्रसिद्ध रील स्टार कोकण हार्टेड गर्लची एण्ट्री पाहायला मिळत आहे. अंकिता वालावलकर ही कंटेंट क्रियेटर बिझनेस वुमन तसेच Vlogger आहे. अंकिताच्या Kokanheartedgirl या इंस्टाग्राम अकाउंटवर पाच लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

Tags: ankita walavalkarankita walavalkar exitbigg boss marathi season 5
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : अभिजीत, सूरज, निक्की Bigg Boss Marathi चे टॉप ३ सदस्य, ज्योतिषाने सांगितलं भविष्य, काय घडणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.