Sonali Patil On Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाच चौथ्या आठवड्यातील नॉमिनेशन झालं. यंदाच्या या आठवड्यात वैभव चव्हाण, आर्या जाधव, इरिना रुडाकोवा, अभिजीत सावंत ही कलाकार नॉमिनेट झाली आहेत. अनेक कलाकार मंडळी या नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांना वोट करुन वाचवण्यासाठी सांगत आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी’ फेम एका अभिनेत्रीने नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांबाबत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. इतकंच नव्हे तर अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने जान्हवी किल्लेकर या स्पर्धकाचाही समाचार घेतला आहे. ही अभिनेत्री म्हणजे सोनाली पाटील.
अभिनेत्री सोनाली पाटीलनेही ‘बिग बॉस मराठी’मध्ये धुमाकूळ घातला होता. आता सोनालीने या नव्या पर्वातील चौथ्या आठवड्यातील नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांबाबत भाष्य करत पोस्ट शेअर केली आहे. सोनाली यावेळी बोलताना असं म्हणाली की, “नॉमिनेशनचा टास्क झाला आहे. वैभव, आर्या, इरिना, अभिजीत दादा नॉमिनेशनमध्ये आहेत. आपण सगळेच अभिजीतला सपोर्ट करतोय. आर्यालाही आपण सपोर्ट करतोय. इरिनाचा गेम मात्र मला कधीच आवडला नाही आणि वैभवचा गेम मला कधीच आवडणार नाही. त्यामुळे त्या दोघांना वोट करण्याचा विषयच नाही. आता राहिला प्रश्न अभिजित दादाचा. तर अभिजीत सावंत सर्वांचाच लाडका आहे. ज्याप्रकारे तो गेम खेळतोय आणि त्याने त्यांची मतंही व्यक्त केली आहेत”.
आणखी वाचा – मुग्धा वैशंपायनला सासरकडच्या घराची ओढ, नवऱ्याचा भजन करतानाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “तिथली आठवण…”
पुढे ती म्हणाली, “कारण नसताना वैभवने अभिजीतला नॉमिनेट केलं होतं. त्याची परतफेड म्हणून आता त्याला नॉमिनेशनमध्ये टाकणं गरजेचं आहे. जर तसं मी नाही केलं तर माझ्यावर प्रेम करणारे लोक काय म्हणतील की, एवढी संधी होती तर मी नॉमिनेट नाही केलं, असं अभिजीत म्हणाला. अभिजीतने स्वतःचा चांगला स्टॅन्ड घेतला आहे. त्याबद्दल विषयच नाही. माझी खूप इच्छा आहे वैभवने घराबाहेर जावं. पण सगळ्या गेमचा विचार करता वैभव आता जाणार नाही. पण मला वाटतं की, इरिना घराबाहेर जाईल”.
दुसरा व्हिडीओ शेअर करत सोनालीने जान्हवीला टोला लगावला आहे. यावेळी सोनालीने असं म्हटलं की, “सूत्रांच्या माहितीनुसार असं कळलं की, जान्हवी किल्लेकरच नाव भावना आहे. भावना हे नाव हिचं कसं असू शकतं. कारण निदान नावाची तरी लायकी ठेवून भावना या नावाप्रमाणे भावना जपायला हव्या होत्या. ‘बिग बॉस’चा खेळ हा नुसता खेळ नसून भावनांचा खेळ आहे. जान्हवी किल्लेकर तुझं नाव तुला लक्षात नसेल तर ते लक्षात आण. जे तुझं नाव आहे भावना त्या नावाची कदर कर. आणि ते नाव इतरांसाठी आणि स्वतःसाठी जागरुक ठेव”.