‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर दोन दिवसांपूर्वीच सूरज चव्हाणला भेटण्यासाठी त्याच्या मोढवे गावी गेली होती. या भेटीचा व्हिडीओ अंकिता वालावलकरने आपल्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताने सूरजच्या गावी जाण्यापासून ते गावी त्याच्याबरोबर केलेल्या खास गप्पा, शेतातली मजामस्ती, तसंच अंकिता व तिच्या होणाऱ्या नवऱ्याने सूरजच्या कुटुंबियांबरोबर साधलेल्या खास संवादाची झलक पाहायला मिळत आहे. यावेळी सूरजने अंकिता व कुणाल यांना भेटण्यासाठी तब्बल एक तास उशीर केला. अंकिताने सूरजला ते पोहचले असल्याचे सांगूनही सूरज पोहायला गेला होता. त्यानंतर सूरज त्यांना न भेटता थेट घरी जातो. यावेळी अंकिता सूरजला सादही देते. पण सूरज फक्त ‘नमस्कार’ म्हणत घरी निघून जातो. एकूणच या व्हिडीओमध्ये अंकिताने सूरजच्या बदललेल्या वागणुकीबद्दलही भाष्य केलं आहे. (Ankita Walawalkar on Suraj Chavan Behavior)
या व्हिडीओमध्ये अंकिता सूरजबद्दल असं म्हणाली आहे की, “मला सगळ्यांना सांगायला आवडेल की, आम्ही सूरजला आधीच सांगितले होते की, आम्ही इथे पोहोचलो आहोत. त्यानंतर एक तास सूरज नव्हता. मग तो आला आणि आम्हाला न भेटताच तो घरात गेला. मग तो आम्हाला भेटला. आणि हे सगळं जे आहे तो कुणाच्या तरी म्हणण्याप्रमाणे करत आहे. हा तो सूरज नाही ज्याला मी ‘बिग बॉस’च्या घरात भेटले होते. त्याला इथे जसं सांगितलं जात आहे तसा तो वागत आहे आणि हेच दाखवण्यामागचे कारण आहे”.
आणखी वाचा – चारुलता व भुवनेश्वरी यांच्यातील गोंधळात अक्षराला वेडं ठरवण्याचा प्रयत्न, मोठं संकट, अधिपतीची साथ मिळणार?
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “सूरजच्या काळजीपोटी मी नेहमीच बोलत आली आहे. बऱ्याच गोष्टी मी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. काही गोष्टींमध्ये मी न बोलणं पसंत केलं आहे. पण या सगळ्यामुळे मलाच अडकवण्याचा प्रयत्न, माझ्या बाबतीत काहीतरी चुकीचं होण्याचा प्रयत्न मला जाणवला. सूरजकडे गेल्यावरही मला जाणवलं आणि तिथून आल्यावरही जाणवलं. माझेही काही चाहते आहेत त्यांना उत्तर देणं मला भाग वाटत आहे. या सगळ्याबद्दल मी लवकरच बोलेन”. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट करत अंकिताची बाजू घेतली आहे.
आणखी वाचा – तुळजाने सूर्याला केलं प्रपोज, होकार देणार का?, ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मोठा ट्विस्ट
“अंकिता तु मनाने खूप छान आहेस, लोकं काहीही अफवा पसरवतात परंतु तू सूरजशी मैत्री जप, तो चांगला मुलगा आहे”, “मराठीत एक म्हण आहे, “जिथे गुळाची ढेप, तिथे मुंगळे जास्त”. असाच काहीसं तिथे चालले आहे”, “अंकिता, असला प्रकार सगळीकडे चालतो. त्याचा विचार करु नकोस. तू सूरजला लांब करु नकोस, त्याला तुमच्यासारख्यांची खरच गरज आहे”, “पैसा आला ना की चांगले चांगले बिघडतात आणि या सुरजला बिघडवणारे त्याच्याच परिवारातले आजूबाजूचे सदस्य आहेत. पण तू खूप चांगली मुलगी आहे”. अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.