काही दिवसांपूर्वीच आलेल्या झी मराठी वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हळूहळू आपलं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेद्वारे अभिनेता नितिश चव्हाणने झी मराठीवर पुन्हा एकदा कमबॅक केले. बहिणींना आईची माया देऊन जपणारा सूर्या दादा प्रेक्षकांना विशेष भावला. या मालिकेतील सूर्या आणि तुळजा ही फ्रेश जोडीही रसिकांचे मन जिंकत आहे. त्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे. सूर्या व तुळजा यांचे लग्न ही त्यांच्या आयुष्यात घडणारी अनपेक्षित गोष्ट होती. बालपणापासून सूर्या ज्या मुलीवर जीवापाड प्रेम करत होता ती तुळजा होती. अशातच आता तुळजाही सूर्याच्या प्रेमात पडणार आहे. (Lakhat Ek Aamcha Dada Serial Update)
सूर्या व तुळजा यांच्या या नवीन ट्विस्टचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. तुळजाने सूर्याला नदीकाठी खास सरप्राइज देऊन प्रपोज केलं असल्याचे पाहायला मिळणार आहे. झी मराठी’ वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या रंजक कथानकाकहा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तुळजा सूर्याबरोबर नदीकाठी फिरताना दिसत आहे. यावेळी दोघांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतात. तेव्हा सूर्या तुळजाला म्हणतो, “आपण इथे घर-घर खेळायचो.” तेव्हा तुळजा म्हणते, “तू नेहमी हे बोलायचा की, या घाटावर आपण आपलं घर बांधू या. मी घर बांधू नाही शकले पण तुझ्यासाठी हे तयार केलं आहे”. तिथे तुळजाने सूर्यासाठी एक खोली तयार केलेली असते आणि या खोलीला फुलांनी सजावट केलेली असते.
आणखी वाचा – चारुलता व भुवनेश्वरी यांच्यातील गोंधळात अक्षराला वेडं ठरवण्याचा प्रयत्न, मोठं संकट, अधिपतीची साथ मिळणार?
सजवेलेली ती खोली पाहून सूर्या म्हणतो, “तुळजा हे कशासाठी?” तेव्हा तुळजा म्हणते की, “मी तुझ्या प्रेमात पडली आहे”. हे ऐकून सूर्या टाळ्या वाजवत “लय मोठा जोक केलास” असं म्हणतो. त्यानंतर तो जोरजोरात हसू लागतो. तेव्हा तुळजा चिडते आणि म्हणते, “प्लीज हसू नकोस. नाहीतर मी घाटावरून नदीत उडी टाकेन”. त्यानंतर तुळजा नदीत उडी टाकते आणि तिला पाहून सूर्याही लगेच तिला वाचवण्यासाठी नदीत उडी टाकतो आणि म्हणतो, “तू उडी का मारलीस?” तेव्हा तुळजा नदीतूनच आय लव्ह यू सो मच सूर्या…. असं म्हणते.
आणखी वाचा – अशोक शिंदेंना ‘छावा’ चित्रपटाची होती ऑफर, भूमिकेसाठी दिला स्पष्ट नकार, म्हणाले, “नकारात्मक पात्र होतं आणि…”
‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. अनेक प्रेक्षकांनी तशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. “हे असंच व्हायला पाहिजे”, “झी मराठी पहिल्यांदा काहीतरी चांगलं दाखवत आहे”, “खूपच भारी” या आणि अशा अनेक प्रतिक्रियांद्वारे नेटकऱ्यांनी या प्रोमोला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, आता तुळजाने सूर्याला प्रपोज केल्यानंतर सूर्या तिला काय उत्तर देणार? पुढे त्यांची ही लव्हस्टोरी कोणत्या नवीन वळणावर जाणार? हे लवकरच पाहायला मिळणार आहे.