‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी झालेली अंकिता प्रभू वालावलकर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत असते. सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करा चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असतो. अशातच सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत आणि हे फोटो आहेत तिच्या नवीन गाडीचे. (ankita walawalkar new car)
अंकिता वालावलकर गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे आणि या चर्चेत आता आणखी भर पडली आहे ती म्हणजे तिच्या या नवीन गाडीची.अंकिताने एक आलिशान गाडी खरेदी केली असून या नवीन गाडीबरोबर चे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अंकिताने नव्या गाडीविषयी पोस्ट शेअर करण्याआधी ‘तुम्ही तयार आहात का?’, ‘ती आलीये, वाट बघतेय’ अशा उत्सुकता वाढवणाऱ्या इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केल्या होत्या.

त्यानंतर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये अंकिताने महागडी गाडी घेतल्याचे समोर आले. होणारा नवरा कुणाल भगतचा हात हातात घेऊन, नव्याकोऱ्या महागड्या गाडी शेजारी उभं राहून तिने हा फोटो पोस्ट केला. ‘आवडी आली’, असं कॅप्शन देत तिने ही इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. याशिवाय या पोस्टसाठी तिने हनी सिंगचं ‘मिलेनिअर’ हे गाणंही वापरलं आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपली पहिली कार विकली होती.
आणखी वाचा – जुई गडकरीला करायचं आहे लग्न, होणाऱ्या नवऱ्याबाबत सांगितल्या अपेक्षा, म्हणाली, “प्रपोज न करता…”
ही कार विकल्यावर अंकिताने, दुसरी गाडी घ्यायचा विचार होता म्हणून जुनी गाडी विकली होती. अखेर नवीन महागडी गाडी घेत अंकिताने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. दरम्यान, अंकिताच्या आयुष्यात सध्या आनंदी वातावरण आहे. अवघ्या काही दिवसांवर तिचे लग्न आले असताना एक नवीन आलिशान महागडी कार तिने खरेदी केली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात अंकिता-कुणाल लग्न करणार असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यामुळे आता त्यांचे अनेक चाहते मंडळी लग्नाची आतुरतेने वाट बघत आहेत.