‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे आता जवळपास आठ आठवडे पूर्ण झाले आहेत. म्हणजेच या शोने दोन महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. दोन आठवड्यांनी या घरातील खेळ आता आणखीनच रोमांचक होत चालला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्पर्धा दिवसेंदिवस कठीण होत असल्याची पाहायला मिळाली. आठव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. ‘बिग बॉस’ने दोन गटांत घरातील सदस्यांची विभागणी केली. एका टीममध्ये निक्की, अरबाज, सूरज, वर्षा आणि जान्हवी हे पाच सदस्य होते. तर, दुसऱ्या टीममध्ये अभिजीत, अंकिता, धनंजय, पॅडी आणि संग्राम हे पाच जण होते. (Arbaz Patel on Hindi Bigg Boss)
या नॉमिनेशनच्या टास्कच्या नियमानुसार कमी पॉईंट्स मिळाल्याने टीम A थेट नॉमिनेट झाली होती. त्यामुळे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षा आणि सूरज या पाच सदस्यांचा समावेश होता. त्यामुळे या पाच सदस्यांपैकी घरातून बाहेर कोण जाणार? याविषयीच्या अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. अशातच या घरातून अरबाजने निरोप घेतला आहे. अरबाजने या घरातून निरोप घेणे हे त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच धक्कादायक आहे. अरबाज या आठवड्यात कॅप्टन असल्यामुळे सेफ असेल असा अंदाज चाहत्यांनी लावला होता, मात्र हा अंदाज चुकीचा ठरत अरबाजचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील प्रवास संपला आहे.
आणखी वाचा – अभिमानास्पद! ९७ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी ‘लापता लेडीज’ची निवड, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
अशातच याने नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला “हिंदी ‘बिग बॉस’मध्ये जाणार का? आणि तिथेही निक्की किंवा तिच्यासारखी मैत्रीण हवी आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत त्याने असं म्हटलं की, “हिंदी ‘बिग बॉस’बद्दल लवकरच कळेल. हिंदी ‘बिग बॉस’मध्ये जायची माझी खूप इच्छा आहे. आता हिंदी ‘बिग बॉस’ लवकरच येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र बघेल आता काय होईल ते. लवकरच येऊ शकतो”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : बाई गंऽऽ करमत नाही गंऽऽ! अरबाज गेल्यानंतर निक्कीची वाईट अवस्था, रडून हाल अन्…
त्यानंतर त्याने निक्कीविषयी असं म्हटलं की, “‘बिग बॉस मराठी’प्रमाणे हिंदी ‘बिग बॉस’मध्ये पण निक्की असावी असं वाटत आहे. तिचा गेम प्लॅन, तिच्या स्ट्रॅटेजी, कोणाला न घाबरणे हे गुण सर्वांना दिसले आणि हेच गुण सर्व मुलींमध्ये असले पाहिजेत असं मला वाटतं. कारण तुमच्या समोरची कोणती व्यक्ती तुम्हाला कशी वागवेल हे सांगता येत नाही. समोरची व्यक्ती तुमच्याबरोबर वाईट वागत आहे आणि तुम्ही निक्कीसारखे वागले तर समोरचा व्यक्ती तुमच्याबरोबर तसं वागणार नाही. समोरच्याची काळजी घेणे प्रेम करणे हे ठीक आहे. पण निक्कीसारखे रोख वागणे प्रत्येक मुलीमध्ये असलं पाहिजे. मी घरातून बाहेर निघतानाची तिची दुसरी बाजू लोकांना दिसली. तिची ती बाजू बघून सर्वानाच रडू आले असेल”.