सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभिमानास्पद! ९७ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी ‘लापता लेडीज’ची निवड, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 23, 2024 | 1:28 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Laapataa Ladies directed by Kiran Rao and produced by Aamir Khan is India's official entry for the 97th Oscars.

किरण राव दिग्दर्शित आणि आमिर खान निर्मित'लापता लेडीज'ची ही 97 व्या ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका आहे.

Laapataa Ladies Oskar Selection : ‘लापता लेडीज’ हा चित्रपट १ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. किरण रावच्या चित्रपटाचं समीक्षक आणि प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं होतं. महिला सक्षमीकरणावर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप भावला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांना क्षणभर हसवलं तर रडवलंही. नुकतेच लग्न झालेले दोन जोडपे एका ट्रेनमध्ये चढतात. दोन्ही नववधूंच्या चेहऱ्यावर मोठे बुरखे आहेत. ते दोघे ट्रेनमधून उतरण्याच्या घाईत कसे बेपत्ता होतात आणि पुढे काय होते? याची गोष्ट ‘लापता लेडीज’ या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. कथानक उत्तम असेल तर ती कलाकृती उत्तम होते हे ‘लापता लेडीज’ने सिद्ध करुन दाखवलं. (97 Oskar Awards Laapataa Ladies Selection)

प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याबरोबरच त्यांच्या ज्ञानात भर घालण्याचं काम ‘लापता लेडीज’ने केलं. ‘लापता लेडीज’ या चित्रपटात तीन नवोदित कलाकार आहेत. मात्र या नवीन कलाकारांना पाहून ते नवोदित कलाकार आहेत असं कुठेही वाटत नाही. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसनंतर ओटीटीवरही चांगली कमाई केली. अशातच आता याबद्दल आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे हा चित्रपट ‘ऑस्कर २०२५’साठी निवडला गेला आहे आणि या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा श्रेणीसाठी निवड झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Jio Studios (@officialjiostudios)

आणखी वाचा – आधी वडील नंतर भावाचं झालं होतं निधन, अपूर्वा नेमळेकर एकटीच पडली, म्हणाली, “थोडा वेळ रडून…”

भारतीय चित्रपटाला सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचा ऑस्कर मिळावा यासाठी दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा आता संपणार आहे. चेन्नई येथील एका कार्यक्रमात, ९७ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी अधिकृत प्रवेश निवडण्यासाठी जबाबदार असलेली सर्वोच्च संस्था, ‘द फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या सदस्यांनी ‘लापता लेडीज’ या चित्रपटाला अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून घोषित केले आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : बाई गंऽऽ करमत नाही गंऽऽ! अरबाज गेल्यानंतर निक्कीची वाईट अवस्था, रडून हाल अन्…

किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा चित्रपट बिप्लब गोस्वामी यांच्या कादंबरीवर आधारित आहे. यात रवी किशन, स्पर्श श्रीवास्तव, प्रतिभा रांता, नितांशी गोयल व मराठी अभिनेत्री छाया कदम यांच्या भूमिका आहेत. ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली आहे. दरम्यान, याआधी ऑस्करच्या अंतिममध्ये स्थान मिळविणारा आमिर खान व आशुतोष गोवारीकर यांचा यांचा ‘लगान’ (2001) हा चित्रपट होता. जो ‘नो मॅन्स लँड’कडून पराभूत झाला.


Tags: 97th Oscar AwardsLaapataa LadiesLaapataa Ladies NewsLaapataa Ladies Oscar Selection
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 arbaaz patel statement

Bigg Boss Marathi : "आदर खूप आहे पण…", छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार न करण्यावरुन अरबाजच स्पष्टीकरण, म्हणाला, "त्या क्षणी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.