शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : बाई गंऽऽ करमत नाही गंऽऽ! अरबाज गेल्यानंतर निक्कीची वाईट अवस्था, रडून हाल अन्…

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 23, 2024 | 12:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 After Arbaz Patel exit from house Nikki Tamboli is completely alone

Bigg Boss Marathi 5 मधून अरबाज बाहेर गेल्यानंतर निक्की घरात पूर्णपणे एकटी पडली आहे

Bigg Boss Marathi 5 : पहिल्या दिवसापासून घरातील दोन व्यक्तींची जोरदार चर्चा होती. अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी या दोन नावांमुळे ‘बिग बॉस मराठी’चा प्रत्येक आठवडा गाजला होता. त्यांच्या वागण्यावर प्रेक्षकांमधूनही नाराजीचे सूर उमटत होते. तसेच वारंवार या दोघांनाही घराबाहेर काढण्याची विनंती प्रेक्षकांकडून केली जात होती. पण आता अरबाज पटेल घराबाहेर पडला असून त्याचा खेळ आता संपला आहे. अरबाज बाहेर पडताना निक्की अगदी ओक्साबोक्शी रडू लागली. कारण घरात निक्कीला अरबाजशिवाय कुणीच आधार नव्हता. घरातील कुणालाच निक्कीचं वागणं पटत नाही. पण अरबाज आणि निक्कीचे सूर घरात चांगले जुळले होते. पण आता अरबाज घराबाहेर गेल्यामुळे निक्कीचा महत्त्वाचा आधार गेला आहे.  (Bigg Boss Marathi 5 New Promo)

या आठवड्यात रितेश देशमुख नसल्यामुळे ‘बिग बॉस’कडून एलिमिनेशनची प्रक्रिया पार पडली. या आठवड्यासाठी अरबाज पटेल, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर आणि जान्हवी किल्लेकर हे कलाकार नॉमिनेट होते. त्यामध्ये प्रत्येक सदस्यासमोर एक बॅग ठेवली होती. त्यामध्ये सेफ असं कार्ड ठेवण्यात आलं होतं. यामध्ये सूरज, जान्हवी आणि वर्षाताई हे तिघे जण सेफ झाले. पण निक्की आणि अरबाज डेंजर झोनमध्ये होते. यामध्ये अरबाजचा खेळ संपला असल्याचं ‘बिग बॉस’ने जाहीर केलं.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – आधी वडील नंतर भावाचं झालं होतं निधन, अपूर्वा नेमळेकर एकटीच पडली, म्हणाली, “थोडा वेळ रडून…”

अशातच आता निक्कीचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात अरबाज नंतर निक्की घरात पूर्णपणे एकटी पडल्याचे जाणवत आहे, अरबाजनंतरची निक्कीची झालेली अवस्था समजून ‘बिग बॉस’नेही या प्रोमोला ‘अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी’ हे गाणं लावलं आहे. तसंच या प्रोमोमध्ये निक्की अरबाज तू कुठे गेला आहे मला सोडून असं म्हणताना दिसत आहे. तसंच “तुझ्या नावाचा कप घेतला आहे. पण तूच या घरात नाहीयेस” असंही स्वत:शीच म्हणत आहे. यानंतर निक्की स्वत:ला असं म्हणते की, “आता ही राणी हलली आहे असं मला वाटत आहे”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi घेणार एक मोठा निर्णय, महत्त्वाची घोषणा करताच सदस्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडणार, नेमकं काय झालं?

दरम्यान, गेल्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून संग्राम व अरबाज या दोन स्पर्धकांनी निरोप घेतला आहे. त्यामुळे आता घरातली स्पर्धा दिवसागणिक उत्कंठावर्धक होत चालली असल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय ‘बिग बॉस मराठी’चा १०० दिवसांचा खेळ आता ७० दिवसांतच संपणार असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर सुरु आहेत. त्यामुळे आता या घरात पुढे काय काय होणार आहे? हे येतया काळात प्रेक्षकांसमोर येईलच

Tags: Arbaz Patelbigg boss marathi 5nikki tamboli
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
Sangram Chougule On Abhijeet Sawant

"अभिजीतच दोन्ही टीमला फसवतो", संग्रामने सांगितलं घरात नक्की काय घडतं?, म्हणाला, "स्वतःला सेफ करण्यासाठी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.