सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Hindi मध्ये होणार अरबाज पटेलची एन्ट्री?, तिथेही हवी आहे निक्कीची साथ, म्हणाला, “आता महाराष्ट्र बघेल की…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 23, 2024 | 4:13 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 fame Arbaz Patel commented on he will join Hindi Bigg Boss see the details

Bigg Boss Hindi मध्ये होणार अरबाज पटेलची एन्ट्री? स्वत:चं केलं भाष्य,

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे आता जवळपास आठ आठवडे पूर्ण झाले आहेत. म्हणजेच या शोने दोन महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. दोन आठवड्यांनी या घरातील खेळ आता आणखीनच रोमांचक होत चालला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्पर्धा दिवसेंदिवस कठीण होत असल्याची पाहायला मिळाली. आठव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. ‘बिग बॉस’ने दोन गटांत घरातील सदस्यांची विभागणी केली. एका टीममध्ये निक्की, अरबाज, सूरज, वर्षा आणि जान्हवी हे पाच सदस्य होते. तर, दुसऱ्या टीममध्ये अभिजीत, अंकिता, धनंजय, पॅडी आणि संग्राम हे पाच जण होते. (Arbaz Patel on Hindi Bigg Boss)

या नॉमिनेशनच्या टास्कच्या नियमानुसार कमी पॉईंट्स मिळाल्याने टीम A थेट नॉमिनेट झाली होती. त्यामुळे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षा आणि सूरज या पाच सदस्यांचा समावेश होता. त्यामुळे या पाच सदस्यांपैकी घरातून बाहेर कोण जाणार? याविषयीच्या अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. अशातच या घरातून अरबाजने निरोप घेतला आहे. अरबाजने या घरातून निरोप घेणे हे त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच धक्कादायक आहे. अरबाज या आठवड्यात कॅप्टन असल्यामुळे सेफ असेल असा अंदाज चाहत्यांनी लावला होता, मात्र हा अंदाज चुकीचा ठरत अरबाजचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील प्रवास संपला आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – अभिमानास्पद! ९७ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी ‘लापता लेडीज’ची निवड, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

अशातच याने नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला “हिंदी ‘बिग बॉस’मध्ये जाणार का? आणि तिथेही निक्की किंवा तिच्यासारखी मैत्रीण हवी आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत त्याने  असं म्हटलं की, “हिंदी ‘बिग बॉस’बद्दल लवकरच कळेल. हिंदी ‘बिग बॉस’मध्ये जायची माझी खूप इच्छा आहे. आता हिंदी ‘बिग बॉस’ लवकरच येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र बघेल आता काय होईल ते. लवकरच येऊ शकतो”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : बाई गंऽऽ करमत नाही गंऽऽ! अरबाज गेल्यानंतर निक्कीची वाईट अवस्था, रडून हाल अन्…

त्यानंतर त्याने निक्कीविषयी असं म्हटलं की, “‘बिग बॉस मराठी’प्रमाणे हिंदी ‘बिग बॉस’मध्ये पण निक्की असावी असं वाटत आहे. तिचा गेम प्लॅन, तिच्या स्ट्रॅटेजी, कोणाला न घाबरणे हे गुण सर्वांना दिसले आणि हेच गुण सर्व मुलींमध्ये असले पाहिजेत असं मला वाटतं. कारण तुमच्या समोरची कोणती व्यक्ती तुम्हाला कशी वागवेल हे सांगता येत नाही. समोरची व्यक्ती तुमच्याबरोबर वाईट वागत आहे आणि तुम्ही निक्कीसारखे वागले तर समोरचा व्यक्ती तुमच्याबरोबर तसं वागणार नाही. समोरच्याची काळजी घेणे प्रेम करणे हे ठीक आहे. पण निक्कीसारखे रोख वागणे प्रत्येक मुलीमध्ये असलं पाहिजे. मी घरातून बाहेर निघतानाची तिची दुसरी बाजू लोकांना दिसली. तिची ती बाजू बघून सर्वानाच रडू आले असेल”.  

Tags: Arbaz Patelbigg boss marathi 5hindi bigg boss
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily updates Ankita Walawalkar commented on ex contestant Arbaaz Patel

Bigg Boss Marathi : “जाताना तो किडे करुन गेला”, अंकिताचे अरबाजबद्दल भाष्य, कोकण हार्टेड गर्ल असं का म्हणाली?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.