नुकताच दिवाळीचा सण मोठ्या जल्लोषात आणि आनंदात पार पडला. दिवाळीच्या सणानिमित्त अनेक जण नवीन वस्तूंची खरेदी करतात. दिवाळीच्या सणात घर, गाडी किंवा काही उपयोगी वस्तूंची खरेदी करण्याची परंपरा आहे. काही दिवसांपूर्वी ‘आई कुठे काय करते?’ फेम अभिनेत्री रुपाली भोसलेने नवीन गाडी खरेदी केली असल्याचे पाहायला मिळाले. याची खास झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली होती. अशातच आता बिग बॉस मराठी ५ फेम अभिनेता निखिल दामलेनेही नवीन गाडी खरेदी केली आहे. (Nikhil Damle New Car)
निखिलने नवीन गाडी खरेदी केली असून ही नवीन गाडी खरेदी करतानाचे काही खास क्षण त्याने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. निखिल दामलने नव्या आलिशान गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. “नव्या सदस्याचं स्वागत आहे”, असं कॅप्शन निखिलने व्हिडीओवर दिलं आहे. या व्हिडीओमध्ये निखिल आपल्या स्वप्नातल्या गाडीची पूजा करताना दिसत आहे. यावेळी अभिनेत्याबरोबर कुटुंबातील सदस्य आहेत. निखिल दामलेचा हा व्हिडीओ पाहून ‘बिग बॉस मराठी’तील सदस्यांसह इतर कलाकार मंडळी शुभेच्छा देताना दिसत आहेत.
आणखी वाचा – आथिया शेट्टी व के.एल.राहुल आई बाबा होणार, लग्नाच्या दोन वर्षानंतर गुडन्यूज, शेअर केली खास पोस्ट
निखिलने नवीन गाडी घेताच त्याच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. टेलिव्हिजन विश्वातील तसेच बिग बॉसच्या घरातील काही लोकांनी त्याला या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये नवीन गाडीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पुरुषोत्तमदादा पाटील, अभिजीत सावंत, सौरभ चौघुले, समृद्धी केळकर, शरयू सोनावणे, चेतना भट व ऐश्वर्या शेटे अशा अनेक कलाकारांनी निखिल दामलेवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “हार्दिक अभिनंदन”, “खूप खूप शुभेच्छा”, “चला आता पार्टीला”, “मला पण गाडीची एक चक्कर पाहिजे” या आणि अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी क कलाकारांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
आणखी वाचा – 09 November Horoscope : मेष, सिंह, कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस आर्थिक सावधगिरीचा, जाणून घ्या…
दरम्यान, निखिलने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. “ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘यशोदा’, ‘रमा राघव’ या मालिकांमध्ये तो विविधांगी भूमिकेत झळकला आहे. त्याची ‘रमा राघव’ ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेनंतर त्याने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभाग घेतला. यामुळे तो आणखी प्रसिद्धी झोतात आला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात निखिलचा खेळ जास्त पाहायला मिळाला नाही, त्यामुळे तिसऱ्या आठवड्यात निखिल योगिता चव्हाणसह एलिमिनेट झाला होता.