शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

…अन् त्या मुलीला बेड मिळवून देण्यासाठी केइएम रुग्णालयात पोहोचली अंकिता वालावलकर, रुग्णाचे नातेवाईक म्हणाले, “शब्द नाहीत…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 3, 2024 | 9:43 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 fame Ankita Walawalkar help for her friend's sister getting bed in KEM hospital.

मित्राच्या मदतीसाठी धावून आली अंकिता वालावलकर, केइएम रुग्णालयात बेड मिळवून देण्यासाठी केली मदत

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामधून कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर घराघरांत पोहोचली. सोशल मीडियावर ती रील स्टार म्हणून लोकप्रिय होतीच पण ‘बिग बॉस मराठी’मुळे तिच्या या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली आहे. ‘बिग बॉस मराठी ५’ पासून अंकिता कायमच चर्चेत आहे. ‘बिग बॉस’ संपल्यानंतर अंकिता तिच्या वैयक्तिक आयुष्यात रमलेली पाहायला मिळत आहे. कायम नाती जपणारी अशी तिची चाहत्यांमध्ये ओळख निर्माण झाली आहे. ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर अंकिता सोशल मीडियावर पुन्हा एकदा नव्याने सक्रीय झाली आहे. (Ankita Walawalkar Help Her Friend’s Sister)

अंकिता वालावलकर सोशल मीडियाद्वारे आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, या पोस्टमधून अंकिताने एका मित्राला मदत केली असून अंकिताच्या मदतीमुळे तिच्या मित्राला वैद्यकीय सहाय्य मिळाले आहे. अंकिताच्या एका मित्रासाठी तिने केईएम हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून दिला आहे आणि याबद्दल अंकिताच्या मित्राने तिचे कौतुकदेखील केलं आहे.

अंकिताच्या मित्राने तिचे कौतुक करत असं म्हटलं आहे की, “अंकिता बोलण्यासाठी शब्द नाहीत. माझ्या एका कॉलवर माझ्या बहिणीसाठी स्वतः गेलीस आणि तिला बेड मिळवून दिलास. मैत्रीत धन्यवाद बोलून तुला परक नाही करणार. पण तुझ्यासारखी एक जवळची मैत्रीण लाभली याचा मला नेहमी अभिमान राहील”. मित्राची ही स्टोरी अंकिताने रिशेअर केली आहे.

आणखी वाचा – Tula Shikvin Changlach Dhada : भुवनेश्वरीचं सत्य समोर आणण्यात अक्षरा यशस्वी, तरीही लेकासाठी चारुहास लग्न करणार का?

अंकिताने केईएम हॉस्पिटलमधील एक व्हिडीओही शेअर केला आहे, ज्यात एक गृहस्थ हॉस्पिटलमध्ये घाईघाईत चालतानाचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओसह तिने “मुलीला बेड मिळवा म्हणून वडिलांची तळमळ” असं लिहिलं आहे. तसंच आपत्कालीन वैद्यकीय सुविधा विभाग आणि अ‍ॅम्ब्युलन्सचा फोटो शेअर केला आहे आणि “फक्त एका मुलीच्या वडिलांसाठी” असं लिहिलं आहे.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाची जय्यत तयारी, निसर्गरम्य वातावरणात Bride To Be Party, फोटो व्हायरल

दरम्यान, अंकिता वालावलकर ही सोशल मीडिया इन्फ्लूएंसर असण्याबरोबरच युट्यूबरदेखील आहे. युट्यूबवर ती तिचे व्लॉग व्हिडीओ शेअर करत असते. लवकरच ती लग्नबांधणार अकडणार असून तिच्या लग्नाची तिचे अनेक चाहते मंडळी आतुरतेने वाट पाहत आहेत.  अशातच आता अंकिताने मित्राला केलेल्या या मदतीमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Tags: Ankita Prabhu walawalkarAnkita Walawalkar help for her friend's sisterBigg Boss Marathi 5 Fame Ankita Walawalkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
the sabarmati report special screening

विक्रांत मेस्सीच्या निर्णयानंतर लगेचच संसद भवनात ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचे खास स्क्रिनिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.