शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi च्या घरातील डीपी दादांची आहे गावागावांत हवा, पाठींब्यासाठी गावकऱ्यांनी केली तुफान पोस्टरबाजी, म्हणाले, “सपोर्ट करायचा आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 7, 2024 | 4:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 DP aka Dhananjay Powar support posters put up in villages video viral on social media

Bigg Boss Marathi 5 च्या डीपी फेम धनंजय पोवार यांची आहे गावागावांत हवा, पाठिंब्यासाठी लावले पोस्टर, व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. बिग बॉस मराठीचा खेळ दणक्यात सुरू झाला आहे. पहिल्या दोन दिवसांत छान मिळून मिसळून राहिल्यानंतर काही दिवसांनी घरचं वातावरणच बदललं आहे. घरात दोन गट झाल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे कलाकारमंडळी तर दुसरीकडे सोशल मीडिया स्टार्सचा धुमाकूळ. या सीझनमध्ये एक दोन नव्हे तर तीन सोशल मीडिया स्टार्सची एन्ट्री झाली आहे. एक आहे कोकण हार्डेट गर्ल अंकिता वालावकर, दुसरा हे गुलिगत धोका फेम सूरज चव्हाण तर तिसरा आहे डीपी अर्थात धनंजय पोवार. (Bigg Boss Marathi 5 Dhananjay Powar Support)

आपल्या कोल्हापूरी अंदाजानं धनंजय पोवार यांनी नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. याच जोरावर त्यांची ‘बिग बॉस मराठी’साठी निवड झाली आहे. करोना लॉकडाऊनमध्ये अनेकांनी घरबसल्या कंटेंटची निर्मिती केली. घरातल्या छोट्या मोठ्या गंमती जंमती सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून शेअर केल्या. अनेकांचे रील्स प्रचंड व्हायरल झाले. बरेच जणं या काळात सोशल मीडिया स्टार म्हणून लोकप्रिय झाले. त्यापैकी एक धनंजय पोवार. आई आणि सुनेच्या मध्ये अडकलेल्या नवऱ्याचे मजेशीर व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर करणं सुरू केलं. त्यांचे हे व्हिडिओ घराघरांत पाहिले गेले.

View this post on Instagram

A post shared by Dhananjay Powar (@dhananjaypowar_dp)

आणखी वाचा – “रोमान्सही जमत नाही अन्…”, अमृता फडणवीसांचं पती देवेंद्र फडणवीसांबाबत वक्तव्य, म्हणाल्या, “राजकारणा शिवाय…”

तर डीपी म्हणजेच धनंजय पोवार यांचं इचलकरंजी इथं सोसायटी फर्निचर हे तीन मजली भव्य असं शोरुम आहे. एक व्यावसायिक म्हणूनही त्यांनी मोठी लोकप्रियता आणि यश मिळवलं आहे. त्यामुळे गावागावात त्यांची अमाप लोकप्रियता आहे आणि  याच मुळे त्यानं अगदी छोट्या छोट्या गावातूनही पाठींबा मिळत आहे. धनंजय यांच्या समर्थनार्थ गावागावांत त्यांच्या नावाचे बॅनर आणि पोस्ट लागले आहेत. ‘व्होटिंग करायचं, सपोर्ट करायचं आणि आपल्या डीपी भाऊला जिंकवायचं’ असं लिहिलेलं डीपी भाऊंचं बॅनर सर्व गावागावातून लागले असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : मनाचा मोठेपणा! सूरजने टीमला दिलं कॅप्टन्सी मिळाल्याचं संपूर्ण श्रेय, रितेश देशमुखही भारावला, म्हणाला, “योग्य ती भूमिका…”

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’मध्ये दिवसेंदिवस ते आपला खेळ अधिक चांगला बनवत आहेत.  प्रत्येक खेळात आणि टास्कमध्ये ते आपली मते ठाम मांडताना दिसत आहेत. टास्कमदये खेळण्याबरोबरच आपल्या विनोदी शैलीने ते सदस्यांचे मनोरंजनही करत आहेत. आताच्या नॉमिनेशनमध्ये त्यांचं नाव आहे, मात्र त्यांची लोकप्रियता पाहता ते आणखी काही दिवस घरात टिकूaन राहतील असं दिसत आहे      

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Marathi Newsdhananjay powar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Nomination will be held in house new promo sheared on social media

Bigg Boss Marathi च्या घरात पार पडणार पाचवं एलिमिनेशन, ‘या’ सदस्याला मिळणार निरोपाचा नारळ?, प्रोमो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.