Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन चांगलाच गाजला. या घरात गायक, पुढारी नेते अभिनेते यांसह सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्सनीही प्रवेश केला होता. सोशल मीडिया स्टार असलेल्या सुरज चव्हाणच्या एन्ट्रीवरुन सुरुवातीला त्याच्यावर टीका करण्यात आली होतं. पण काही दिवसांतच त्यानं टीका कराणाऱ्यांचीही मनं जिंकली. सुरुवातील त्याला बिग बॉसचा गेम समजलाच नव्हता. पण सगळ्या स्पर्धकांनी त्याला यासाठी मदत केली. होस्ट रितेश देशमुख यानं देखील त्याचा आत्मविश्वास वाढवला. सुरुवातील त्याला बिग बॉसचा गेम समजलाच नव्हता. पण सगळ्या स्पर्धकांनी त्याला यासाठी मदत केली. होस्ट रितेश देशमुखनेदेखील त्याचा आत्मविश्वास वाढवला. (Bigg Boss Marathi 5 Suraj and Nikki Marriage)
या घरात सूरजने अनेकदा त्याच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. त्याला नेमकी कशी मुलगी हवी आहे? याबद्दल त्याने अनेकदा भाष्य केलं आहे. अशातच त्याने पुन्हा एकदा आपल्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. याआधी सुरजनं एका अनाथ मुलीबरोबर लग्न करुन तिच्या आयुष्यातलं हे एकटेपण दूर करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता त्याला त्याचं लग्न अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे असं म्हटलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सूरज, अभिजीत व निक्की हे एकत्र बसलेले असताना तो लग्नाविषयी भाष्य करतो.
यावेळी सूरज असं म्हणतो की, “मी माझ्या लग्नात सर्वांना बोलवणार आहे. पण मी लग्न अगदी छोटं आणि साध्या पद्धतीने करणार आहे. एकमेकांना हार-गजरे घालून आणि मरीआई देवीच्या देवळात जाऊन लग्न करणार. हळद, सुपारी शोधणे या सगळ्या गोष्टी होतील. त्याशिवाय मज्जाच नाही येणार”. यानंतर सूरज निक्कीला तिच्या लग्नाविषयी विचारतो. तेव्हा ती असं म्हणते की, “मी लग्न करेन तेव्हा तुला बोलवेन. कधी लग्न करेन हे मला नाही माहीत. पण सध्या मला माझ्या आई-बाबांबरोबर राहायचं आहे. मी कुणाशीही लग्न केलं तरी मी माझ्या आई-बाबांबरोबरच राहीन. घर कुणाचंही असेल पण मी आई-बाबांना एकत्र घेऊनच राहणार”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 मध्ये आज होणार एलिमिनेशन, कोणता सदस्य घेणार शेवटचा निरोप?
यापुढे निक्की असं म्हणते की, “आई-बाबांना मी सोडणार नाही. मला मोठे कुटुंब आणि खूप मुलं असं कुटुंब आवडतं. मी माझ्या घरी बादशाह आहे. माझ्यासाठी लोक सगळं जग सोडायला तयार आहेत तर तो त्याचे आई-बाबा सोडणार नाही का? त्याचे आई-वडीलही एकत्र राहिले तरी चालेल. एका बंगल्यात सगळ्यांनी एकत्र राहणे मला खूप आवडते. असं एकटं एकटं नाही आवडत”.