Bigg Boss Marathi 5 : ‘बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये आता ग्रँड फिनालेच्या काऊंटडाऊनला सुरुवात झाली आहे. यंदाचं पर्व शंभर दिवसांऐवजी अवघ्या ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काहीच दिवसांत या पर्वाचा विजेता किंवा विजेती जाहीर होणार आहे. सध्या घरात एकूण ७ सदस्य आहेत. यांच्यापैकी निक्की तांबोळीने ‘तिकीट टू फिनाले’च्या शर्यतीत बाजी मारत अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर, उर्वरित सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. गेल्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे हे ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडले. अशातच आता ‘बिग बॉस’नं मिड वीक एलिमिनेशन होणार असल्याचं सांगितलं होतं आणि तेच एलिमिनेशन आज पार पडणार आहे. (Dhananjay Powar On Abhijeet Sawant)
‘बिग बॉस’च्या घरात नुकताच सेलिब्रेशन आठवडा पार पडला. घरातील स्पर्धकांना आपला प्रवास एका चित्रफितीच्या माध्यमातून पाहता आला. आतापर्यंत झालेल्या ‘बिग बॉस’च्या प्रत्येक सीझनमध्ये अंतिम आठवड्यात घरातील सगळ्या स्पर्धकांना त्यांचा प्रवास दाखवला जातो. मात्र यावेळी तो थोडा आधीच दाखवला गेला. यासाठी घरात शिव ठाकरेची एन्ट्री झाली होती. आपला प्रवास पाहून घरातील प्रत्येक सदस्य भावुक झाला. यावेळी डीपी म्हणजेच धनंजय पोवारने स्वत:चा प्रवास पाहिल्यानंतर स्वतःशीच संवाद साधला. यावेळी त्याने घरातील निघून गेलेल्या सदस्यांबद्दलचे मत व्यक्त केले.
यावेळी डीपी यांनी असं म्हटलं की, “काय मस्त प्रवास होता. खतरनाक… नादखुळा… त्या प्रवासात माझा खेळ दाखवण्यात आला. कोण काय बोललं हे दाखवण्यात आलं. काही लोकांवर आपण प्रेम केलं हे दाखवलं. काही लोक आपल्याबद्दल बोलले ते दाखवलं. या घरात मला वैभवसारखा एक मित्र आणि अंकितासारखी एक बहीण मिळाली आणि ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. पॅडीदादसारखा एक व्यक्ती मला मिळाला. पण त्याला समजून घेणे आमच्याकडून कमी पडलं. आम्ही त्याला कमी समजू शकलो”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 मध्ये आज होणार एलिमिनेशन, कोणता सदस्य घेणार शेवटचा निरोप?
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “यासाठी मी पॅडीदादाची माफी मागेन, एवढी नाती मी नक्कीच टिकवेन. अभिजीतबरोबर काय होईल माहीत नाही, कारण त्याने ज्यापद्धतीने पलटी मारली. त्यावरुन मला वाटत नाही त्याच्याबरोबर मला नातं टिकवता येईल…”. दरम्यान, ‘बिग बॉस’नं मिड वीक एलिमिनेशन होणार असल्याचं सांगितलं होतं आणि तेच एलिमिनेशन आज पार पडणार आहे. त्यामुळे आजच्या एलिमिनेशनमध्ये घरातील नक्की कोणता सदस्य बाहेर जाणार? याची सदस्यांबरोबरच प्रेक्षकांनाही धाकधूक लागून राहिली आहे.