Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये आता ग्रँड फिनालेच्या काऊंटडाऊनला सुरुवात झाली आहे. यंदाचं पर्व शंभर दिवसांऐवजी अवघ्या ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सध्या घरात एकूण ७ सदस्य आहेत. यांच्यापैकी निक्की तांबोळीने ‘तिकीट टू फिनाले’च्या शर्यतीत बाजी मारत अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर, उर्वरित सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. गेल्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे हे ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडले. अशातच आता ‘बिग बॉस’नं मिड वीक एलिमिनेशन होणार असल्याचं सांगितलं होतं आणि तेच एलिमिनेशन आज पार पडणार आहे. (Bigg Boss Marathi 5 Mid Week Eviction)
‘बिग बॉस मराठी’चा खेळ आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. शेवटच्या टप्प्यात आता हा खेळ आणखी रंगतदार होत चालला आहे. काहीच दिवसांत या पर्वाचा विजेता किंवा विजेती जाहीर होणार आहे. अशातच आज घरात होणाऱ्या एलिमिनेशनमध्ये घरातील नक्की कोणता सदस्य बाहेर जाणार याची सदस्यांबरोबरच प्रेक्षकांनाही धाकधूक लागून राहिली आहे. त्यामुळे घराबाहेर जाणारा सदस्य नक्की कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
आणखी वाचा – “काही नग भेटले पण…”, कास्टिंग काऊचबद्दल सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली, “अशा माणसांना मी खूप…”
काहीच दिवसांत या पर्वाचा विजेता किंवा विजेती जाहीर होणार आहे. अशातच आज घरात DJ Kratex आपल्या स्टाईलने प्रेक्षकांचं आणि घरातील सदस्यांचं चांगलच मनोरंजन करणार आहे. DJ Kratex हा भारतातील नावाजलेला डीजे आणि संगीत निर्माता आहे. विविध प्रकारच्या संगीताची आजवर त्याने निर्मिती केली आहे. तरुणांना त्यांचं वेगळच आकर्षण आहे. हाच DJ Kratex आता ‘बिग बॉस’प्रेमींवर आपली छाप पाडणार आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या नवीन प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ पुढे म्हणतात की, “आज होणार आहे या सीझनचं मिड वीक एव्हिक्शन”. त्यामुळे शेवटच्या आठवड्यापर्यंत पोहोचलेल्या कोणत्या सदस्याचा प्रवास आज संपणार याकडे आता ‘बिग बॉस’प्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे.