Bigg Boss 18 : ‘बिग बॉसच्या १८’ व्या पर्वाचे बिगुल आता वाजले आहे. उद्या ६ ऑक्टोबरपासून हा नवीन शो सुरु होणार आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या शोची चर्चा पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस १८’ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदा ‘बिग बॉस’च्या घरात कोणते स्पर्धक येणार हे, जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. ‘बिग बॉस १८’साठी अनेक सेलिब्रिटींची नावे चर्चेत आहेत. या नावांमध्ये अध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्य यांच्या नावाचीही चर्चा होती. इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या एका प्रवचनात या शोबद्दलही सांगितलं होतं. (Aniruddhacharya On Set Bigg Boss 18)
अशातच ‘बिग बॉस १८’ च्या सेटवरुन अनिरुद्धाचार्य यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘बिग बॉस १८’ च्या बाहेर उभे राहून अनिरुद्धाचार्य कॅमेरासमोर पोज देताना आणि लोकांशी संवाद साधताना दिसत आहेत. अनिरुद्धाचार्य यांचा हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण त्यांनी एकदा म्हटलं होतं की “‘बिग बॉस’च्या लोकांनी मला करोडो रुपयांची ऑफर दिली होती, पण मी ती नाकारली… जर मी माझ्या धर्मासाठी करोडो रुपयांची ऑफर नाकारु शकलो तर तुम्हाला वाटत नाही का? की तुम्हीही तुमच्या सन्मानासाठी ते केले पाहिजे”.
अनिरुद्धाचार्य जी यांनी स्पष्टपणे सांगितले होते की ते ‘बिग बॉस १८’चा भाग होणार नाहीत. यामुळे त्याच्या चाहत्यांची थोडी निराशा झाली असेल, पण त्यांच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढवली आहे. ‘द खबरी’नुसार, अनिरुद्धाचार्य या शोमध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत. अशातच ते आता या शोमध्ये स्पर्धक म्हणून जाणार की पाहुणे म्हणून येणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi चे टॉप ६ स्पर्धक, पण सूरजलाच सर्वाधिक सपोर्ट, तुमचं मत कोणाला?
दरम्यान, ‘बिग बॉस १८’चा यंदाचा सीझन ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यावेळी शोची थीम वेळ आणि भविष्यातील भविष्याचा तांडव यावर आधारित आहे. हळूहळू या शोमधील स्पर्धकांची पहिली झलक शेअर केली जात आहे. ‘बिग बॉस’च्या घरात कोणते स्पर्धक सहभागी होणार? हे रविवारीच कळेल. अभिनेता सलमान खान या शोचे होस्टिंग करणार आहे.