शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा खेळला जाणार कॅप्टन्सीचा टास्क, कोण होणार आता नवीन कॅप्टन, प्रोमो समोर

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 5, 2024 | 9:32 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates new captaincy task in the house promo shared on social media

Bigg Boss Matathi 5 मध्ये होणार पुन्हा होणार कॅप्टन्सी टास्क, कोण होणार आता नवीन कॅप्टन, उत्सुकता शिगेला

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहाव्या आठवड्याची सुरुवात झालेली आहे. पहिल्या दिवसापासून संपूर्ण घर ‘टीम A’ आणि ‘टीम B’ अशा दोन गटांमध्ये विभागलं गेलं होतं. दोन्ही टीम एकमेकांमध्ये भिडल्या. गेल्या आठवड्यापासून सदस्यांमध्ये असलेल्या मैत्रीचं समीकरण काहीसं बदललं आहे. अशातच बुधवारच्या भागात बीबी करन्सीसाठी BB फार्ममध्ये सदस्य जोरदार राडा करताना दिसले. बीबी फार्ममधून जास्तीत जास्त दूध गोळा करताना चांगलाच कल्ला झाला. मात्र या टास्कचा एकही नियम सदस्यांकडून पाळला गेला नाही. यामुळे ‘बिग बॉस’ने शिक्षा म्हणून हा टास्कच रद्द केला. तसेच या टास्कमध्ये विजयी होणाऱ्या टीम किंवा टीममधील सदस्याला एक विशेषाधिकार देण्यात येणार होता. तोदेखील रद्द करण्यात आला. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)

परिणामे या घरात आता कॅप्टन्सीसाठी आज पुन्हा एकदा एक नवीन टास्क खेळला जाणार आहे आणि या नवीन टास्कचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटद्ववारे नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यातून बिग बॉस मराठीच्या घरचा नवीन कॅप्टन कोण होणार हे कळणार आहे.  या नवीन टास्कमध्ये कॅप्टन्सी कंटेडरची बस निघणार असून यामुळे घराला एक नवीन कॅप्टन मिळणार आहे. यावेळी अंकिता गणपतीसाठी तिकीट कन्फर्म झाली असल्याचे सांगत बसमधून मला जाऊद्या असं पॅडी कांबळे यांना सांगते. तर पॅडी कांबळेदेखील तिला “मला जाऊदे” असं मिश्किल उत्तर देतात.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – 05 September Horoscope : गुरुवारचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असणार आहे आणि तुमच्या नशिबात काय असेल?

पुढे अरबाज “मी घन:श्यामपेक्षा चांगली कॅप्टन्सी करु शकतो” असं म्हणताच अभिजीत घन:श्यामची बाजू घेत “का घन:श्याम कॅप्टन होऊ शकत नाही” असा प्रश्न उपस्थित करतो. यापुढे पॅडी घन:श्यामला “गुच्चा मारीन तुला” असं म्हणतात. यावर दुखावलेला घन:श्याम “आधीच जवळच्या लोकांनी गुच्चा मारलेला कमी आहे का?” असं म्हणतो. यावरुनच यंदाच्या कॅप्टन्सी टास्कमध्येही आपली माणसेच आपल्या माणसांना दुखावणार असल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा – ‘किल’ ते ‘तणाव 2’, या विकेण्डला अनुभवा मनोरंजनाची मेजवानी, क्राइम व थ्रिलर चित्रपटांचा खजिना, जाणून घ्या

दरम्यान, वर्षा यांच्या नंतर आता घराला नवीन कॅप्टन कोण मिळणार? याकडेदेखील सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. याआधी अंकिता, अरबाज, निक्की व आता वर्षा आदी सदस्य अनुक्रमे घरच्या कॅप्टन झाले आहेत. त्यामुळे आता या घरात नवीन कॅप्टन कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेच. याशिवाय या कॅप्टन्सी टास्कमध्ये कोणता स्पर्धक बाजी मारणार हेदेखील पाहायला मिळणार आहे.

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Newsnew captaincy task
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Paaru Serial Update todays episode

Paaru Marathi Serial : पारू-आदित्यचं नवरा-बायको असल्याचं नाटक येणार का समोर?, आलेलं हे संकट प्रिया सांभाळून घेणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.