Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची चर्चा सर्वत्र सुरू असून आता हा खेळ अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात शेवटच्या आठवड्यातसुद्धा सदस्यांची बाचाबाची झालेली पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या एका भागामध्ये अंकिता, निक्की आणि अभिजीत यांच्यात घरातील कामाच्या ड्युटीवरून वादावादी झालेली पाहायला मिळाली. यावेळी निक्की, जान्हवी, वर्षा, डीपी, सूरज, अंकिता आणि अभिजीत घरातील कामाची विभागणी करून घेत असतात. तेव्हा अभिजीत निक्कीची वॉशरूम साफ करण्याची ड्युटी काढून घेऊन तिला डायनिंग टेबल पुसण्याची ड्युटी देतो. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
‘बिग बॉस मराठी’च्या काही दिवसांपूर्वी झालेल्या भागामध्ये निक्की, जान्हवी, वर्षा ताई, डीपी, सूरज, अंकिता आणि अभिजीत घरातील कामाची विभागणी करून घेत असतात. तेव्हा अभिजीतची निक्कीची वॉशरूम साफ करण्याची ड्युटी काढून घेऊन तिला डायनिंग टेबल पुसण्याची ड्युटी देतो. त्यांच्यातील हे वाद कमी झाले असले तरी दोघांमध्ये धुसपुस कायम आहे. त्यात अभिजीत निक्कीबरोबर राहत असल्याने अंकिता व डीपी त्याच्यापासून अंतर राखून बोलतात. याचबद्दल अभिजीत त्या दोघांशी बोलायला जातो. मात्र निक्की येताच तो तिथून निघून जातो.
बाथरुम परिसरात अभिजीत, अंकिता व डीपी बोलत असतात आणि निक्कीला पाहून तो दुसरीकडे जातो. त्यावर निक्की दोघांना असं म्हणते की, “अभिजीत गेला का?”. त्यावर अंकिता तिला “तुम्ही इथे होता ना?” असं म्हणते. यावर निक्की दोघांना उत्तर देत असं म्हणते की, “मग काय झालं तुम्ही तर नॉर्मलच बोलत होतात’. यावर अंकिता अभिजीतबद्दल तिला असं म्हणते की, “त्याच्यासाठी हिंमत लागते. बघ थोडी हिंमत दे त्याला… अभिजीतला हिंमतीची गरज आहे.”
नंतर अंकिता डीपीला अभिजीतबद्दल असं म्हणते की, “आतापर्यंतच्या कोणत्याही टास्कमध्ये त्याने कधी प्लॅनिंग केलं नाही. काय केलं नाही आणि याला आमचा गेम दिसत नाही. याला माझा गेम दिसत नाही.” पुढे निक्की अभिजीतला बाहेर येऊन घडलेला सगळा प्रकार सांगते, तेव्हा अभिजीत असं म्हणतो की, “काय वाईट प्रकार आहे हा. तुम्ही जर पांघरुन घालून जर वाईट बोलत असाल तर त्या माणसाला चांगलं थोडी म्हटलं जाणार”.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांच्या डोक्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार आहेच आणि हे एलिमिनेशन आज पार पडणार आहे. त्यामुळे अभिजीत, अंकिता, सूरज, डीपी, वर्षा आणि जान्हवी या उरलेल्या सदस्यांपैकी एलिमिनेशनमध्ये कोणाचा प्रवास संपतोय? याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.