Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी ५’ हा लोकप्रिय टीव्ही शो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या आठवड्याच्या शेवटाला बिग बॉसच्या या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. पंढरीनाथ कांबळे म्हणजेच सगळ्यांचे लाडके पॅडी दादा आता घरातून एलिमिनेट झाले. आता पॅडी घरातून बाहेर पडल्यानंतर टीम बी कोलमडून गेली आहे. त्यात अभिजीत व अंकिता यांच्यात गेले काही दिवस खटके उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये जोरदार भांडणही झाले होते. मात्र दोघांमधील ही धुसपुस कायम आहे. त्यात अभिजीतचे निक्कीबरोबर सारखे बसणे-उठणेही अंकिताला आवडत नसल्याचे दिसून येत आहे. याचबद्दल अभिजीतने अंकिता व डीपी यांच्याशी संवाद साधला. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
यावेळी अभिजीत, अंकिता व डीपी यांना असं म्हणतो की, “तुम्ही दोघं असं एकटे एकटे का बसलेले असता?” यावर अंकिता त्याला उत्तर देत असं म्हणते की, “असं काही नाही. तुम्ही (अभिजीत व निक्की) आता तुमचं तुमचं काहीतरी बोलत असता. त्यामुळे तुमच्यात कसं सामील व्हायचं असं वाटतं? उगाच भडका उडू नये आणि तो आपल्यावर उडू नये असं वाटतं. जेव्हा दिसतं की सगळे एक आहेत आणि त्यात कुणी काही बोललं की उगीच ती ज्वालामुखी उलट आपल्यावरच येऊ शकते असं वाटतं”.
यापुढे धनंजय असं म्हणतात की, “बंधनात राहण्याचा आठवडा होता, तेव्हा तुम्हाला जसं वाटायचं की एकत्र येऊन बसलं तर काय वाटेल. तसं आम्हाला आता वाटत आहे”. यावर अभिजीतही असं म्हणतो की तसं काही नाही. तुम्ही वाटेल तेव्हा येऊन बसू शकता आणि बोलू शकता”. सध्या ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात अभिजीत, सूरज, अंकिता, धनंजय, वर्षा, जान्हवी आणि निक्की तांबोळी हे सात स्पर्धक उरले आहेत. यात टीम बमधील सदस्यांची संख्या जास्त असली तरी आता त्यांच्यात काहीशी फूट पडताना दिसत आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनच्या ग्रँड फिनालेच्या काऊंटडाऊनला सुरुवात झाली आहे. यंदाचं पर्व शंभर दिवसांऐवजी अवघ्या ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काहीच दिवसांत या पर्वाचा विजेता किंवा विजेती जाहीर होणार आहे. अशातच आजच्या मिड वीक एलिमिनेशनमध्ये घरातील नक्की कोणता सदस्य बाहेर जाणार? याची सर्वांना धाकधूक लागून राहिली आहे.