शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi मधून आर्या जाधव घराबाहेर, ‘ती’ चूक महागात पडली अन्…; निर्णय योग्य की अयोग्य?

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 14, 2024 | 10:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates Aarya Jadhav evicted from the house for she slapped Nikki Tamboli

Bigg Boss Marathi मधून आर्या जाधव घराबाहेर, निक्कीला मारल्यामुळे कठोर निर्णय

बिग बॉसच्या घरात कितीही राडे झाले, कितीही वाद झाले तरीही कुणालाही हिंसा करण्याची परवानगी नाही. पण आर्या व निक्कीमध्ये झालेल्या राड्याने हिंसक रुप घेतल्याचं पाहायला मिळालं. टास्कमध्ये निक्की व आर्या दोघीही आक्रमक झाल्या आणि आर्याने निक्कीवर हात उचलला. बिग बॉसच्या घरात हिंसा न करण्याचा बिग बॉसचा मुलभूत नियम आहे. पण आर्याच्या या वागण्यामुळे बिग बॉसचा हा नियम मोडला गेला आणि यामुळे तिला आता बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आर्याने निक्कीला कानाखाली मारल्यानंतर तिला तातडीने जेलमध्ये टाकण्यात आले होते. (Bigg Boss Marathi 5 Aarya Jadhav Evicted)

यावेळी बिग बॉसने आर्याबद्दल अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर घेण्यात येईल असं म्हटलं होतं आणि अखेर रितेशने आर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढलं आहे. यावेळी रितेशने आर्याला झापत असं म्हटलं की, “आर्या या आठवड्यात तुमचा एक गेम होता, समोरच्याला अडवायचं. तो तुमचा गेम होता. पण त्यावर तुमचं एक स्टेटमेंट होतं, निक्की असं वागते मग मी पण अशी वागणार. आर्या मी निक्कीला चुकीच्या वागण्यावर ओरडलो आहे आणि पूर्ण सीझनसाठी त्यांची कॅप्टन्सीदेखील काढून घेतली.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – यालाच म्हणतात संस्कार! ‘हीच आमुची प्रार्थना’ गाणं लागताच सूरजने जोडले हात, साधेपणाचं होतंय कौतुक

यापुढे रितेशने असं म्हटलं की, “मी निक्कीला तिच्या चुकीमुळे कायम ओरडलो आणि तुम्हालाही ओरडणार. आर्या तुम्ही स्वत:ला काय समजता?. तुम्हाला राग आला की तुम्ही कोणावरही हात उचलणार? हे बिग बॉसचं घर आहे. याआधीही घरात अशी स्थिती निर्माण झाली. पण तेव्हा कुणीही कुणावर हात उचलला नाही. पण मला सगळ्यात जास्त राग तुम्ही तुमची चूक मान्य नाही केली याचा आला आहे. म्हणजे थोडक्यात आर्या तुम्ही जे केलं ते शंभर टक्के जाणीवपूर्वक होतं”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुम्ही काय टास्क खेळलात”, कलाकारांबरोबरच रितेशनेही केलं पॅडी कांबळेंच्या खेळाचे कौतुक, म्हणाला, “अरबाजने पकडण्याचा प्रयत्न केला तरी…”  

दरम्यान, भाऊच्या धक्क्यावर अंतिम निर्णय घेताना बिग बॉसने “कॅप्टन्सी कार्यातलं फुटेज वारंवार पाहिल्यानंतर लक्षात आलं की, आर्या निक्कीमध्ये धक्काबुक्की झाली. निक्कीचा आर्याला धक्का लागला आणि त्यानंतर आर्याने हात उचलला. आर्याने केलंल कृत्य बिग बॉसच्या मुलभूत नियमांचं उल्लंघन आहे. बिग बॉसच्या घरात या हिंसेचं समर्थन कधीच केलं जाणार नाही” असं म्हणत बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढलं आहे.

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Aarya Jadhav evictedBigg Boss Marathi 5 News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
15 September daily horoscope

15 September Horoscope : कन्या व वृषभ राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस अनुकूल आहे, कुणाच्या नशिबात नेमकं काय?, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.