Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’ आणि नॉमिनेशन हे जणू एक समीकरणच आहे. घरातील सदस्य स्वतःच्या प्रगतीसाठी पुढे जाण्यासाठी आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी इतर सदस्यांना मागे टाकण्याचा प्रयत्न करतात. याचसाठी घरातील एक स्पर्धक इतर स्पर्धकांना नॉमिनेट करतो. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या कालच्या भागातदेखील ही प्रक्रिया पार पडली आणि यात बिग बॉसने नवीन ट्विस्ट आणत ही नॉमिनेशन प्रक्रिया आणखी रंगतदार बनवली. याआधी घरातील १५ स्पर्धकांपैकी एकूण सहा सदस्य नॉमिनेट झाले होते. यात सूरज, पॅडी, निखिल, योगिता, घन:श्याम व निक्की हे नॉमिनेट झाले होते. मात्र आता यापैकी दोन सदस्य सुरक्षित झाले आहेत. (Bigg Boss Marathi 5 daily update)
घरातील सूरज, पॅडी, निखिल, योगिता, घन:श्याम व निक्की हे सदस्य नॉमिनेट झाले होते. मात्र यापैकी घन:श्याम व पॅडी हे दोन सदस्य नॉमिनेशनपासून सुरक्षित झाले आहेत. ‘बिग बॉस’ने अभिजीत व अरबाज यांना पॉवर कार्ड वापरायचा नवीन टास्क दिला होता. यामध्ये त्यांना काही पॉवर कार्ड वापरायला सांगितले होते आणि यात या दोघांनी नॉमिनेशनपासून वाचवण्याचे पॉवर कार्डचा वापर केला. यावेळी अभिजीतने पॅडीला सुरक्षित केलं तर अरबाजने निक्कीला नॉमिनेशनपासून सुरक्षित केलं.त्यानंतर ‘बिग बॉस’ने या खेळामध्ये नवीन ट्विस्ट आणला आणि घरातील दोन टीमपैकी जिंकलेल्या टीमला पॉवर कार्डचा वापर करायला सांगितलं.
यामध्ये टीम A ने आधीचा टास्क जिंकला होता. त्यामुळे या टीमपैकी कुणीतरी एकाने पॉवर कार्डचा उपयोग करावा हे सांगितलं. तेव्हा निक्की, अरबाज, घन:श्याम, जान्हवी या टीमने वैभवचं नाव निवडलं. यात वैभवला बिग बॉसने पॉवर कार्डचा वापर करताना पाच कार्डबद्दल सांगितले. तेव्हा वैभवने घरातील कोणत्याही स्पर्धकाला सुरक्षित करुन त्याऐवजी दुसऱ्या स्पर्धकाचे नाव घेण्याचे कार्ड वापरले. त्यामुळे वैभवने घन:श्यामला नॉमिनेशनपासून सुरक्षित केलं आणि त्याऐवजी त्याने अभिजीतचं नाव घेतलं.
आणखी वाचा – “बाबा तुमची आठवण येतेय”, विलासराव देशमुखांच्या स्मृतीदिनानिमित्त रितेश-जिनिलीया भावुक, फोटोही केले शेअर
त्यामुळे आता नॉमिनेशन प्रक्रियेतील एकूण सहा स्पर्धकांपैकी पॅडी, घन:श्याम व निक्की हे तीन स्पर्धक सुरक्षित झाले आहेत. तर योगिता, निखिल, सूरज व अभिजीत हे स्पर्धक नॉमिनेशन प्रक्रियेत आहेत. म्हणून आता घराबाहेर जाण्याच्या शर्यतीत योगिता, निखिल, सूरज व अभिजीत यांच्यात चांगलीच चुरस रंगणार आहे. त्यामुळे आता घराबाहेर नक्की कोण जाणार? आणि कोण राहणार? हे येत्या शनिवार-रविवारच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.