रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “चला वाट मोकळी करा”, निक्की-जान्हवीला बिनधास्त नडल्यानंतर योगिता चव्हाणचा नवरा खूश, आता गेम ऑन

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 16, 2024 | 6:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 saorabh choghule on yogita chavan

जान्हवी-निक्कीशी भिडली योगिता चव्हाण, प्रोमो पाहून नवऱ्याने केला फुल्ल सपोर्ट, कमेंटही केली

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाची सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. अल्पावधीतच ही कलाकार मंडळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढताना दिसत आहेत. सध्या ‘बिग बॉस’च्या घरात कॅप्टन्सी टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. यंदाच्या पर्वात सहभागी झालेल्या अभिनेत्री योगिता चव्हाणच्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान योगिताने सह स्पर्धकांना आपला जलवा दाखवत उत्तम खेळ खेळला आहे. टीम बी मध्ये योगिता असून ती तिच्या टीमसाठी वा कॅप्टन होण्यासाठी लढा देताना दिसत आहे.

योगिताचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास सुरु झाला तेव्हा ती अगदी शांत होती. समोरच्यांची ओळख पटेपर्यंत योगिताने तोंडातून चकार शब्द काढला नाही. विशेष म्हणजे टास्क दरम्यान योगिता उत्तम खेळताना दिसली. आता पुन्हा एकदा योगिताने टास्कमध्ये उत्तम खेळत स्पर्धकांना इंगा दाखवला आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की, जान्हवी यांनी योगिताला खाली पाडलं आणि तिला खेचलं. हे योगिताला सहन झालं नाही शेवटी योगिताने तिचा इंगा दाखवत निक्की व जान्हवी यांच्यावर पलटवार केला.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : जान्हवी-निक्कीने जमिनीवर ढकलून खेचताच योगिता भडकली, दोघींशी दोन हात करत बिनधास्त नडली, कॅप्टन तिच होणार?

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

हा धाकड गर्लचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. योगिता निक्की व जान्हवीला पुरुन उरलेली दिसत आहे. हा प्रोमो पाहून आता योगिताच्या नवऱ्याने म्हणजेच अभिनेता सौरभ चौघुलेने कमेंट केलेली पाहायला मिळत आहे. सौरभने या प्रोमोखाली कमेंट करत, “चला आता वाट मोकळी करा”, असं म्हटलं आहे. योगिताने उत्तम खेळावं असं सौरभला मनापासून वाटत आहे, याबाबत सौरभने इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. दरम्यान, इकडे योगिताला ‘बिग बॉस’च्या घरात मानसिक त्रास होतं आहे. इथे रहायचं नसल्याचं तिने स्पष्ट सांगितलं आहे. असं असलं तरी ती उत्तम खेळ खेळताना दिसत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “कुत्रीच आहे, हिची औकात…”, आर्याला घाणेरड्या शब्दांत निक्कीने सुनावलं, मर्यादा ओलांडत तिच्या अंगावर पडली अन्…

“योगिता खूप छान खेळत आहात, तुम्हाला बाहेर यायचं आहे हे जाहीरपणे सांगायला नको होते. तुमच्यासारख्या हळव्या मनाच्या मुलीला खोट्या वागणाऱ्या, नौटंकी लोकांमध्ये त्रास झाला असेल पण तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. तुम्हाला खरोखरच पुन्हा एकदा घरात राहावे वाटले तर नक्कीच जाहीरपणे सांगा जनता तुम्हाला सेफ करेल”, अशी कमेंट ‘बिग बॉस’ फेम तृप्ती देसाई यांनी केली आहे. तर अभिनेत्री साक्षी गांधी हिनेदेखील कमेंट करत योगिताचं कौतुक केलं आहे.

Tags: bigg boss marathibigg boss marathi 5Saorabh Choughule On bigg boss marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
17 august 2024 Saturday daily horoscope marathi news bhavishyavani astrology 12 zodiac sign know more

17 August Horoscope : शनिवारचा दिवस मेष आणि मीन राशीच्या लोकांसाठी नोकरी-व्यवसायासाठी उत्तम, आर्थिक फायद्याची चिन्ह  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.