‘बिग बॉस मराठी’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’मध्ये कलाकार मंडळी, राजकीय क्षेत्रातील पुढारी, रील स्टार, गायक, रॅपर अशी विविध क्षेत्रातील कलाकार मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या घरात दरवर्षीप्रमाणे यंदाही राजकीय व्यक्तीचा सहभाग पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वत राजकीय क्षेत्रातील छोटा पुढारी अशी नावलौकीकता मिळवलेल्या घनःश्याम दरवडे याची एण्ट्री पाहणं रंजक ठरतंय. बोलण्याच्या लकबीमुळे चर्चेत असणारा छोटा पुढारी आता ‘बिग बॉस’च्या घरात येत सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. (Ghanshyam Darwade Lifestyle)
घनःश्याम हा उंचीने लहान दिसत असला तरी तो २२ वर्षांचा आहे. त्याची उंची ३ फूट ७ इंच असल्याने तो लहान वाटतो. घनःश्यामने आजवर अनेक राजकीय, सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत गावातील लोकांची मनं वळवली. “माझ्या एका भाषणामुळे ३५ वर्ष सत्तेत असलेला आमदार पडला”, असा दावा खुद्द छोटा पुढारीने ‘बिग बॉस’च्या घरात येताच केलं. शेती, बाजारभाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ या विषयांवर छोटा पुढारी नेहमीच परखडपणे भाष्य करताना दिसतो.
गावातील राजकारणापासून ते तालुका राज्यातील परिस्थितीवर अनेकदा त्याने स्पष्ट भाष्य करत मत मांडलं आहे. इतकंच नव्हे तर शेतकरी कुटुंबातील घनःश्यामने शेतकऱ्यांची व्यथाही मांडली आहे. शेती हा घनःश्यामचा जिव्हाळ्याचा विषय आहे. घनःश्याम हा शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या फोटो व व्हिडीओवरुन याची प्रचिती येते. घनःश्यामने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक शेती करतानाचे फोटो, व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
आणखी वाचा – वय व वजनामुळे सलमान खानची झालीय अशी अवस्था, कार्यक्रमात आल्यानंतर नाचताही येईना, आजारपण आणि…
शेतात काम करत कांदे आणि अनेक पिकांची तो शेती करतो. याशिवाय घनःश्यामकडे ट्रॅक्टरही आहे. तो स्वतः ट्रॅक्टर घेऊन शेतात वावरताना दिसतो. इतकंच नव्हे तर खूप शेती असलेल्या घनःश्यामची आर्थिक परिस्थितीही चांगली आहे. त्याच्याकडे चारचाकी गाडी आहे. त्याच्या नव्या चारचाकी गाडीचा व ट्रॅक्टरचा फोटोही त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केला आहे. गावाकडे राहणाऱ्या या छोटा पुढारीचं जीवन गावाकडील संस्कृतीला जपणार आहे. त्याच साधं राहणीमान आपल्याला ‘बिग बॉस’च्या घरातही पाहायला मिळत आहे.