Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून आठव्या आठवड्यात अरबाज पटेलची एक्झिट झाली. घरात नॉमिनेट असलेल्या इतर सदस्यांच्या तुलनेत त्याला प्रेक्षकांची कमी मतं मिळाल्याने अरबाजचा खेळातील प्रवास संपला आणि त्याला घराचा निरोप घ्यावा लागला. अरबाज ‘बिग बॉस’चा खेळ पहिल्या दिवसापासून निक्कीबरोबर खेळत होता. त्यामुळे जवळचा मित्र घरातून बाहेर पडताना निक्की प्रचंड भावुक झाली होती. अरबाज पटेल घराबाहेर होणार अशी घोषणा होताच निक्की ढसाढसा रडत होती. “त्याला बाहेर काढू नका” अशी विनंती तिने शेवटपर्यंत ‘बिग बॉस’ला केली. मात्र, नियमांनुसार त्याला बाहेर पडावं लागलं. (Hemangi Kavi on Arbaz Patel exit)
गेल्या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षा आणि सूरज या पाच सदस्यांचा समावेश होता. त्यामुळे या पाच सदस्यांपैकी घरातून बाहेर कोण जाणार? याविषयीच्या अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. सोशल मीडियावर वर्षा उसगांवकर या घराबाहेर जातील अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर निक्की व अरबाज हे दोघे डेंजर झोनमध्ये असल्याचे दाखवण्यात आले आणि अखेर अरबाजने ‘बिग बॉस मराठी’चा निरोप घेतला.

आणखी वाचा – Bigg Boss च्या घरात सांगकाम्याचा टास्क, मालकाची करावी लागणारं कामं, कोण कोणाच्या तालावर नाचणार?
‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर आल्यानंतर माझ्याबद्दल चुकीचा निर्णय असल्याचे मत अरबाजने व्यक्त केलं आहे. अशातच अरबाजच्या बाहेर येण्यावरून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने भाष्य केलं आहे. हेमांगी कवीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. “तुम्हाला ‘पटेल’ किंवा नाही पटणार पण मज्जा गेली ना राव!” असं म्हणत हेमांगीने उपहसात्मक व हटके पोस्ट शेअर केली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अरबाज आक्रमक आणि निक्की कितीही चुकीचा गेम खेळत असली तरी टास्कमध्ये मज्जा त्यांच्यामुळेचं येत होती आणि याचसंबंधित पोस्ट हेमांगीने शेअर केली आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा पार पडण्यासाठी आता अवघे १२ दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात ‘बिग बॉस’ने या आठवड्यात घरात बाकी राहिलेल्या सगळ्या ८ सदस्यांना नॉमिनेट केलं आहे. सगळे सदस्य नॉमिनेट झाल्याने यात निक्कीचादेखील समावेश आहे. त्यामुळे आता या घरातील कोणते सदस्य शेवटपर्यंत बाजी मारणार हे आगामी भागांतून पाहायला मिळणार आहे.