Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं यंदाचं नवीन पर्व २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. यावर्षी वाइल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री मिळून एकूण १७ सदस्य घरात सहभागी झाले होते. यापैकी घरात आता केवळ ८ सदस्य राहिले असून, यांच्यामध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी रंगतदार लढत होणार आहे. सोमवारपासून ‘बिग बॉस’च्या घरात नवव्या आठवड्याच्या खेळाची सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी ‘बिग बॉस’कडून हा खेळ ७० दिवसांचा असणार असल्याची महत्त्वाची घोषणा करण्यात आली. तसंच घरात नॉमिनेशन टास्कचीही सुरुवात झाली. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची आता अंतिम सोहळ्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’ घरातील स्पर्धकांमध्ये रंगत आणत आहे. अशातच नुकत्याच झालेल्या घरातील काही स्पर्धकांनी एकमेकांना नॉमिनेट केले. यावेळी स्पर्धकांनी आपापल्या जवळच्या लोकांचीही नावे घेतली. अशातच आता ‘बिग बॉस’ आणखी नवीन टास्क घेऊन येणार आहेत. या टास्कमध्ये ‘बिग बॉस’ घरातील सदस्यांनाच एकमेकांची कामे करायला सांगणार आहे.
कलर्स मराठीने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ असं म्हणतात की, “या आठवड्यात आपल्यातील काही सदस्ये सांगकामे ठरणार आहेत आणि उर्वरीत सदस्य असतील त्यांचे मालक, म्हणजेच मालकांनी सांगितलेली त्यांची वैयक्तिक कामेदेखील करावी लागतील”. यामुळे घरातील सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडतानाचे यातून पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता घरातील कोणते सदस्य सांगकामे बनणार आहेत आणि कोणते सदस्य मालक बनणार आहेत हे पाहणे रंजक ठरणार आहे.
आणखी वाचा – Akshay Shinde Encounter प्रकरणावर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “खऱ्या आयुष्यातील सिंबा…”
त्याशिवाय घरातील कोणते सदस्य कोणत्या सदस्यांची वैयक्तिक कामे करणार आहेत? हे पाहण्यासाठीही प्रेक्षक आतुर आहेत. या आठडव्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर जाण्यासाठी आठही सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता यापैकी कोण अंतिम टप्प्यात जाणार आणि कोण मागे राहणार? हे लवकरच पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्की व अभिजीतमध्ये जोरदार भांडण, दोघांनीही मैत्री तोडली, पण नेमकं झालं तरी काय?
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या नवीन पर्वाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या नवीन सीझनने आतापर्यंत ५० हुन अधिक दिवसांचा टप्पा पार केला असून या घरात आता फक्त आठ सदस्य उरले आहेत. त्यामुळे आता अंतिम लढतीसाठी या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे या घरात सुरुवातीला मित्र असणारे आता एकमेकांचे शत्रू बनायला सुरुवात झाली आहे.