Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला आता जवळपास ५० दिवस पूर्ण झाले आहेत आणि या घरातील खेळ आता आणखीनच रोमांचक होत चालला आहे. आठवा आठवडा सुरु झाल्यानंतर ही स्पर्धा दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. अशातच आठव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. आठवड्याच्या थीमनुसार घरात पहिल्याच दिवशी ‘शिकाऱ्याची बंदूक’ हे नॉमिनेशन कार्य पार पडलं. घरात नॉमिनेशन टास्क सुरू होण्यापूर्वी घरातील सगळे सदस्य काय निर्णय घ्यायचा यावर चर्चा करत होते. मात्र, ऐनवेळी ‘बिग बॉस’कडून या नॉमिनेशन कार्यात एक मोठा ट्विस्ट आणण्यात आला. या टास्कध्ये ‘टीम बी’ने उत्तम खेळी खेळत ‘टीम ए’ला थेट नॉमिनेत केलं आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
‘बिग बॉस मराठी’चा खेळाला ५० दिवस पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकजन आता स्वतंत्र गेम खेळण्याचा विचार करत आहे. घरातील आपले स्थान कसे टिकून राहील याकडे प्रत्येकजन विचार करत आहे. अशातच वर्षा उसगांवकरदेखील त्यांचा स्वतंत्र खेळ खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे. घरात आल्यापासून वर्षा या अंकिता, पॅडी, अभिजीत यांच्या ‘ग्रुप ए’मध्ये होत्या. पण सोमवारच्या भागात त्या निक्की-अरबाज यांच्या ‘टीम बी’मधून खेळल्या. यावेळी त्यांचा खेळ तितका प्रभावशाली दिसून आला नाही. पण अरबाज व निक्की यांनी वर्षा उसगांवकरांना पूर्ण पाठींबा दिला. त्यांच्या याच खेळाबद्दल आता ‘टीम ए’मधील सदस्यांमध्ये गॉसिप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
आजच्या भागात पॅडी कांबळे असं म्हणतात की, “कधी कधी ताईंचा (वर्षा उसगांवकर) भरवसा वाटत नाही.” यावर अभिजीत असं म्हणतो की, “सगळ्यात स्वतंत्र आणि उत्तम गेम जर या घरात कोण खेळत असेल तर त्या वर्षा ताई आहेत”. त्यानंतर पॅडी पुन्हा अरबाज निक्की यांच्याबद्दल असं म्हणतात की, “हे दोघे ताईंना फिरवणार. बोलून बोलून त्यांना गुंतवणार”. यावर अभिजीत पॅडी यांना असं म्हणतो की, “ते ताईंना नाही गुंतवणार. ताई आपल्या सर्वांना बरोबर गुंतवत आहेत. तुमचं नॉमिनेशन असतं तर तुम्ही ताईंचं नाव घेतलं नसतं. त्या आपल्यापैकी कुणाचंही नाव घेऊ शकतात. पण त्यांचं नाव ना आपला ग्रुप घेऊ शकत, ना दूसरा ग्रुप घेऊ शकत”.
आणखी वाचा – Video : अभ्युदय नगरच्या गणपतीला कुटुंबासह आरतीला पोहोचले आदेश बांदेकर, चाळीतील जुन्या दिवसांची आठवण
दरम्यान, अभिजीत व पॅडी यांच्या म्हणण्याप्रमाणे आता वर्षा उसगांवकर त्यांचा स्वतंत्र गेम खेळणार का? हे आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोमवारच्या नॉमिनेशन टास्कमध्ये वर्षा उसगांवकर, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर व सूरज चव्हाण असे एकूण पाच स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता यापैकी बिग बॉसच्या घराबाहेर कोण जाणार? हे येत्या शनिवार-रविवारच्या भागात प्रेक्षकांना कळेल.